Viral: उठा ले रे भगवान, मेरेको नहीं बॉस को! एकतर नोकऱ्या नाहीत, ज्या आहेत त्या असे नियम लावतात

मात्र, हे नियम कोणत्या कार्यालयात करण्यात आले आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. @CleverMonsterCT नावाच्या युजरने ट्विटरवर पोस्ट केले आहे. याला 3 लाख 80 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. 29 हजारहून अधिक लोकांनी याला रिट्विट केलं आहे, तर हजारो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

Viral: उठा ले रे भगवान, मेरेको नहीं बॉस को! एकतर नोकऱ्या नाहीत, ज्या आहेत त्या असे नियम लावतात
उठा ले रे भगवान, मेरेको नहीं बॉस को!Image Credit source: blogspot
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 8:16 PM

तुम्ही कधी ऑफिसला (Office) उशिरा गेला आहात का? मग काय नियम असतात ऑफिसचे? खासगी ऑफिसांना (Private Sector Office) एक लगाम लावणारं कुणीही राहिलेलं नाही. हवं तेव्हा, हवे ते नियम लावून मोकळे होतात. सुट्ट्यांचे सुद्धा इथे कसलेच सरकारी नियम पाळले जात नाहीत. कर्मचारी वैतागून जातात, पण करतील काय? आधीच नोकऱ्यांची (Jobs) मारामार त्यात एखादी नोकरी मिळणार. नियम कसेही असू पाळावे तर लागणारच. अशाच एका ऑफिसचा नियम वायरल झालाय.

‘न्यू ऑफिस रूल’

चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी या सूत्रावर अनेक कंपन्या काम करत आहेत. चार दिवसांच्या वर्क वीकच्या सूत्राचा जगभरात विचार सुरू आहे. परंतु अशा काही कंपन्या / कार्यालये देखील आहेत ज्या कर्मचाऱ्यांकडून अधिक उत्पादकता प्राप्त करण्यासाठी नकारात्मक पद्धतींचा अवलंब करीत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये असंच एक उदाहरण दिसून आलं. खरं तर सोशल मीडियावर एका अनोळखी कामाच्या ठिकाणी एक नियम व्हायरल होत आहे, ज्याला ‘न्यू ऑफिस रूल’ असं नाव देण्यात आलं आहे. या व्हायरल नियम पत्रात लिहिलं आहे की, कर्मचारी जितक्या मिनिट उशिरा कार्यालयात येतील, त्यांना ऑफिस संपल्यानंतर त्यानुसार 10 मिनिटांचं अतिरिक्त काम करावं लागेल. ‘न्यू ऑफिस रूल’नुसार एखादा कर्मचारी कार्यालयीन वेळेपासून रात्री 10 वाजून 2 मिनिटांनी उशिरा आला तर त्याला ऑफिस संपल्यानंतर 20 मिनिटे जादा (सायंकाळी 6:20 पर्यंत) काम करावे लागेल

हे सुद्धा वाचा

मात्र, हे नियम कोणत्या कार्यालयात करण्यात आले आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. @CleverMonsterCT नावाच्या युजरने ट्विटरवर पोस्ट केले आहे. याला 3 लाख 80 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. 29 हजारहून अधिक लोकांनी याला रिट्विट केलं आहे, तर हजारो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

संमिश्र प्रतिक्रिया

या पोस्टमध्ये युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. कुणी ‘न्यू ऑफिस रूल’ पूर्णपणे चुकीचा ठरवला तर कुणी पुन्हा पुन्हा उशिरा येणाऱ्यांसाठी हा नियम योग्य असल्याचं सांगितलं. एका युझरने सांगितले – ऑफिसचा नियम थोडा कठोर आहे. त्याचवेळी आणखी एका युझरने सांगितले – व्यावसायिक पद्धतीने उशिरा येणाऱ्यांसाठी थोडे काटेकोर असणे गरजेचे आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.