Viral: तूप घेऊन जाणारा टँकर उलटला, लोकांना जसं समजलं लोकं तसं पळत गेले, तूप गोळा करायला!
Rajasthan Viral Video: राजस्थानमध्ये तुपाने भरलेला टँकर उलटला आणि मग काय लोकांनी टँकर चांगलाच लुटला. लोकं काय घाबरतायत होय? छे...लोकं ना पोलिसांना घाबरले आणि ना त्या टँकरवाल्याला!
राजस्थान: काही दिवसापूर्वी बारामतीतला एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला होता ज्यात दोन गाड्यांची धडक झाली होती. छोटा टेम्पो दारूच्या बाटल्यांची वाहतूक करत होता. अपघातात त्या बाटल्या सगळ्या रस्त्यावर पडल्या. टेम्पो राहिला बाजूला लोकांनी बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. व्हिडीओ बघून असं वाटत होतं. तिथे जमलेले लोकं एकमेकांना फोन करून त्या बाटल्या उचलायला बोलवत होते. व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. खरं तर हे फक्त भारतातच होय शकतं! लोकांना कधी काय महत्त्वाचं वाटेल काय सांगता येत नाही आणि मग असेच व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. आणखी एक असाच व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात लोकं चक्क अपघात (Accident Viral) झालेल्या गाडीतून पडलेलं तूप (Ghee) गोळा करतायत!
लोकं ना पोलिसांना घाबरले आणि ना त्या टँकरवाल्याला!
राजस्थानमध्ये तुपाने भरलेला टँकर उलटला आणि मग काय लोकांनी टँकर चांगलाच लुटला. लोकं काय घाबरतायत होय? छे…लोकं ना पोलिसांना घाबरले आणि ना त्या टँकरवाल्याला! आणले भांडे आणि घेतलं तूप भरायला फटाफट. या महागाईच्या काळात खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडत असल्यावर जमिनीवर तूप वाहताना दिसले तर कोण चुकवेल? राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील बनास भागात झालेल्या अपघाताने लोकांना अशीच संधी दिली, ज्यानंतर लोकांनी रस्त्यावर वाहत असलेल्या तुपावर हात साफ केला.
तुपाची लूट करणाऱ्यांची झुंबड
ठाण्याच्या हद्दीतील चौपदरी महामार्गावरील गांधीधाम येथून शनिवारी रुद्रपूर उत्तराखंडसाठी भरून आलेला टँकर बनास कल्व्हर्टजवळ अचानक पलटी होऊन दुभाजकावर आदळला. यादरम्यान टँकरचे इंजिन व केबिनचा भाग रस्त्यापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या टँकरपासून वेगळा होऊन शेतात पडला आणि तुपाने भरलेला टँकर पलटी होऊन रस्त्यावर वाहू लागला. या अपघाताची वार्ता लोकांपर्यंत पोहोचताच क्षणार्धात तुपाची लूट करणाऱ्यांची झुंबड उडाली.
पोलिसांनी जमावाला दूर पळवलं
काहींनी हातात बादली आणली. काहींनी बाटली आणली. कुणीही संधी सोडली नाही पोलिसांच्या उपस्थित लोकांना मोफत तूप मिळालं. अक्षरशः इतकी लोकं जमली की शेवटी पोलिसांनी या जमावाला दूर पळवलं आणि क्रेनच्या साहाय्याने टँकर महामार्गावर नेण्यात आला. महिनाभरापूर्वी सावरुपगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर दुधाचा टँकर अनियंत्रितपणे उलटला होता, त्यानंतरही लोकांनी याच संधीचा फायदा घेत फुकटच्या दुधावर हात साफ केला होता.