Video: 1 मीटर लांब सापाला माशाने सहज गिळलं, व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, नदीच्या काठावरचा एक मासा सापासारख्या प्राण्याला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

Video: 1 मीटर लांब सापाला माशाने सहज गिळलं, व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क
माशाने सापाला गिळलं
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 2:53 PM

सोशल मीडियाच्या जगात तुम्हाला सापांचे असंख्य आश्चर्यकारक व्हिडिओ पाहायला मिळतील. पण तुम्ही कधी सापाची शिकार होतानाचा व्हिडीओ पाहिला आहे, तेही माशाच्या जबड्यात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मासाही सापाची शिकार करू शकतो का? पण ते खरे आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मासा सापासारख्या प्राण्याला अतिशय आश्चर्यकारक पद्धतीने गिळताना दिसत आहे. ज्याने हा व्हिडिओ पाहिला तो आश्चर्यचकित झाला. ( Viral Snake Video that a fish swallowed one meter snake people Amazed that viral video)

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, नदीच्या काठावरचा एक मासा सापासारख्या प्राण्याला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. झाडाझुडपातून साप बाहेर येताच मासा तिथं पोहचतो आणि त्याची शिकार करतो. हा मासा पाहताच हळूहळू संपूर्ण सापाला गिळतो.

चला तर मग हा व्हिडिओ पाहूया.

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

माशांचा हा अप्रतिम व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माशाने एक मीटर लांब साप गिळला.’ एक दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 24 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याच वेळी, लोक या व्हिडिओवर सतत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना हा मजेदार वाटला आहे.

एका यूजरने आश्चर्याने कमेंट करत लिहिले की, ‘अरे देवा, हे कसे शक्य आहे’. मी जे पाहिलं ते खरं आहे का?’

याशिवाय अनेक यूजर्स यावर मजेशीर प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘आता हा मासा आठवडाभर पडून राहील.’ त्याचवेळी काही यूजर्स सापासारख्या प्राण्याला ईल फिश असल्याचे सांगत आहेत. जो मासा गिळताना दिसतो तो प्रत्यक्षात मेला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हेही पाहा:

Video: हातात बाटलीही पकडवेना, तरीही दारु पिण्याची हौस, तळीरामाचा पोट धरुन हसवणारा व्हिडीओ व्हायरल!

Video: इम्फाळच्या आर्यन मॅनला महिंद्राचा मदतीचा हात, आता महिंद्रा विद्यापीठात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणार

 

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.