Viral: “स्टार असशील घरी, कोण कुठला तु…” असं म्हणत गर्लफ्रेंडने केलं ब्रेकअप! लाखो फॅन्स असलेला स्टार खडबडून झाला जागा
टॉम बर्चीने आपल्या चाहत्यांना खासकरून एका प्रसिद्ध फूड चेन कंपनीच्या आउटलेटमधून स्वतःसाठी काही खाद्यपदार्थ आणि पेये मागवण्यास सांगितले होते. जेव्हा ही बाब त्याच्या गर्लफ्रेंडला समजली तेव्हा तिला इतकं वाईट वाटलं तिने...
यश आणि प्रसिद्धी काही लोकांच्या डोक्यात खूप जाते.अशा लोकांना इतरांचा अवमान करण्यात आपला अभिमान वाटतो. पण कधी कधी सिंहाला सिंह मिळतो. असाच एक किस्सा ब्रिटनमध्ये घडलाय, ज्यात एका सेलिब्रिटीला त्याच्या गर्लफ्रेंडने (Girlfriend) असा धडा शिकवला की त्याचा सगळा माज उतरलाय. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश सोशल मीडिया स्टार (British Social Media Star) टॉम बर्चीने आपल्या चाहत्यांना खासकरून एका प्रसिद्ध फूड चेन कंपनीच्या आउटलेटमधून स्वतःसाठी काही खाद्यपदार्थ आणि पेये मागवण्यास सांगितले होते. जेव्हा ही बाब त्याच्या गर्लफ्रेंडला समजली तेव्हा तिला इतकं वाईट वाटलं तिने लगेचच तिच्या या 23 वर्षीय एकदम भारी दिसणाऱ्या स्टारसोबत ब्रेकअप (Breakup)केलं. त्याचप्रमाणे व्यवसायावर होणाऱ्या परिणामामुळे त्या पब चेननेही त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं. यामुळे आता हा सोशल मीडिया स्टार खुद्द टॉमही इथे येऊ शकणार नाही किंवा त्याच्या नावाने कुणीही काहीही मागवू शकणार नाही.
व्हिडिओमध्ये कबूल केले
टॉमने स्वतः त्याची कहाणी सोशल मीडियावर शेअर केलीये. टिकटॉक स्टार टॉमने आपल्या व्हिडिओमध्ये कबूल केले आहे की, त्याचा हा प्रॅन्क त्याला महागात पडलाय.त्याच्या आयुष्यात सगळंच खराब झालंय असं तो म्हणतो, शिवाय या कठीण काळात त्याची मैत्रीणही थोड्याशा चुकीवर त्याच्यासोबत ब्रेकअप करून निघून गेली आहे. टॉमने चाहत्यांना स्वतःसाठी खाण्या-पिण्याची ऑर्डर देण्यास सांगताच पबला एकावेळी सुमारे दोन लाख रुपयांची ऑर्डर मिळाली, जी तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करणं अशक्य होतं, असं फूड चेन कंपनीने म्हटलंय.
शिवीगाळ करून प्रेयसी भडकली
टॉम म्हणाला की पबच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सांगितले की तो त्याच्या चाहत्यांच्या सर्व ऑर्डर पूर्ण करू शकत नाही. कारण ऑर्डर देणारे लोक त्यावेळी पबमध्ये नसतात. हे ऐकून टॉम इतका रागावला की, पैसे देऊनही त्याला फक्त एकच पाइंट ड्रिंक मिळालं,ही त्याच्या चाहत्यांची फसवणूक आहे, असं तो म्हणाला. त्याला उत्तर देताना फूड चेनच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आमचे कर्मचारी व्यस्त असल्याने आम्ही एकत्र एवढी मोठी ऑर्डर पूर्ण करू शकत नाही. त्याला उत्तर म्हणून टॉमने शिवीगाळ केली आणि म्हणाला की, जास्त कर्मचारी ठेवा.” टॉमला त्याची हीच चूक महागात पडली. त्याचं असं वागणं बघून संतापलेल्या गर्लफ्रेंडने टॉमला धडा शिकवला आणि त्याला टाटा बाय बाय केलं.