Viral Video: सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू असणारं 200 वर्ष जुनं जहाज सापडलं! व्हिडिओ वायरल
निळ्या आणि हिरव्या रंगाच्या फोटोंमध्ये सोन्याची नाणी, भांडी आणि प्रोक्लेनचे कप अगदी दिसत आहेत जे समुद्राच्या तळाशी पसरलेले आहेत. बराच वेळ समुद्राच्या खाली पडूनही जहाजाचा एक भाग अजूनही अगदी व्यवस्थित दिसतो.
1708 मध्ये ब्रिटिश सैन्याने (British Army) 62 तोफांसह बुडवलेला सॅन जोस गॅलियन (Sunken San Jose Galleon). 2015 मध्ये समुद्रात याचा शोध लागला होता. नुकतीच स्पॅनिश सरकारने या जहाजाच्या ढिगाऱ्यात सोने आणि इतर मौल्यवान वस्तू असल्याचे सांगितल्याची नवी बातमी समोर आली आहे. स्पॅनिश सरकारने त्याचा एक व्हिडिओही जारी केला आहे, जो रिमोट कंट्रोल्ड व्हेइकलमधून रेकॉर्ड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मुख्य युद्धनौकेच्या ढिगाऱ्याजवळ एक बोट आणि जहाज दिसत असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ स्पॅनिश सरकारनं (Spanish Government) ट्विटरवर पोस्ट केला आणि प्रचंड वायरल झाला. लाखो लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत शिवाय हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा केलेला आहे. सरकार आता या सापडलेल्या सोन्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करणार असल्याचं म्हटलं जातंय.
हे जहाज 200 वर्ष जुनं आहे
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, दोन्ही जहाजं 200 वर्ष जुनी आहेत. सरकारने रिमोट कंट्रोल्ड व्हेइकल देशाच्या कॅरिबियन किनाऱ्यापासून 3,100 फूट पाण्याखाली पाठवले होते. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या फोटोंमध्ये सोन्याची नाणी, भांडी आणि प्रोक्लेनचे कप अगदी दिसत आहेत जे समुद्राच्या तळाशी पसरलेले आहेत. बराच वेळ समुद्राच्या खाली पडूनही जहाजाचा एक भाग अजूनही अगदी व्यवस्थित दिसतो. समुद्रकिनारी एक तोफ असल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. याबाबत अधिक माहिती गोळा करण्याचा सरकारचा पुरातत्त्वज्ञांचा प्रयत्न सुरु आहे. या साहित्याच्या मूळ जागेची माहिती गोळा करण्यातही नौदल गुंतले आहे.
¡Qué orgullo! Expedición no intrusiva de @ArmadaColombia en el Galeón San José permitió hallazgo de 2 naufragios.
Esta es una demostración más del trabajo de nuestros hombres y mujeres de Armada, siempre protegiendo los intereses marítimos de la Nación y la soberanía del país. pic.twitter.com/vfjf83sF4W
— Diego Molano Aponte (@Diego_Molano) June 7, 2022
भविष्यातील शोधासाठी अर्थसाह्य
हे सोनं सापडल्यानंतर हे सामान बाहेर काढून भविष्यातील शोधासाठी अर्थसाह्य व्हावं यासाठी व्यवस्था करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यावेळी हे जहाज समुद्रात हरवलेल्या सर्वात मौल्यवान वस्तू वाहून नेत होतं त्यामुळे या सॅन होजे जहाजाचा मलबा पवित्र जहाजाचा मलबा म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे एकप्रकारे आम्ही या खजिन्याचे रक्षण करत आहोत असं इथल्या सरकारचं म्हणणं आहे.