viral video | इमारतीच्या खिडकीत शिरला भलामोठा अजगर, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
एका इमारतीच्या खिडकीत भलामोठा अजगर शिरल्याने त्याची सुटका करतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.
मुंबई | 28 सप्टेंबर 2023 | एका इमारतीच्या खिडकीतून भल्यामोठ्या पिवळ्या जर्द अजगराचा विळखा घातल्याचा धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा अजगर तब्बल दहा फूट लांबीचा असून त्याची सुटका सर्पमित्रांनी मोठ्या धाडसाने करीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. इतका मोठा अजगर या इमारतीवर कसा चढला याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. अखेर दोघा जणांनी इमारतीच्या खिडकीवर चढून या अजगराची सुटका केल्याने रहिवाशांचा जीव भांड्यात पडला.
ठाणे येथील एका इमारतीच्या खिडकीवर अजगराचा विळखा पडल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. एक इसम या खिडकीच्या लोखंडी ग्रिलच्या आत उभा आहे. तर दुसरा जण खिडकीच्या बाहेरून या अजगराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र हा अजगर खिडकीच्या छतावर जाऊन बसल्याने त्याला काढताना या धाडसी सर्पमित्रांना चांगलाच प्रयत्न करावा लागल्याचे दिसत आहे. या इमारतीच्या शेजारील इमारतीवरुन हा व्हिडीओ कोणीतरी चित्रित केल्याचे दिसत आहे. त्यांनी हा व्हिडीओ ट्वीटर ( एक्स ) आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
A huge snake was spotted at a Thane Building, it was rescued by two brave persons, rescue video. 👇. #thane #mumbai pic.twitter.com/j2ZWrs9mR9
— Sneha (@QueenofThane) September 25, 2023
एक्स युजर @QueenofThane या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ ट्वीटर ( एक्स ) वर शेअर करण्यात आला आहे. त्याला कॅप्शन देखील देण्यात आली आहे. ठाण्यातील एका इमारतीवर एक भल्यामोठ्या साप सापडला असून त्याची दोघा धाडसी इसमांनी सुटका केली, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. यावर अनेक जणांनी कमेंट केली आहे. एकाने कमेंट दिली आहे की हा ब्रह्मीज पायथॉन आहे. हा अल्बीनो ब्रह्मीज् पायथॉन आहे. हा जगातील सर्वात मोठ्या आकाराची सापाची जात आहे. या ब्रह्मी पायथॉनची लांबी 9 ते 20 फूटापर्यंत असते आणि वजन 200 पौंडपर्यंत असते. हे अजगर आपल्या भक्ष्यांच्या भोवती वेटोळे मारून त्यांना ठार करतात आणि गिळतात.