Viral Video : 10 वर्षांपासून एकटेपणा आलेल्या शार्कने टाकीवर मारलं डोकं, हा व्हिडीओ पाहाच
कॅनडाच्या मरिनलँड अॅम्युझमेंट पार्कमध्ये राहणाऱ्या व्हेल माशाचा व्हिडीओ गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. (Viral Video: A shark who has been alone for 10 years hits his head on a tank, watch this video)
मुंबई : आपल्या सर्वांनाच माहित आहे की एकटेपणा कोणालाही निराश करतो. एकटेपणाचा त्रास हा खरोखरच वाईट असतो. तुम्हालाही असा अनुभव आलाच असेल. आता तो मनुष्य असो किंवा इतर कोणताही प्राणी सगळ्यांच्याच बाबतीत हे घडत असतं. प्रत्येकजण अशा जोडीदाराच्या शोधात असतो ज्यांच्यासोबत ते आपला वेळ घालवू शकतील. आता प्राण्यांसोबत असं होतं म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्यच वाटलं असेल ना! तर हे खरं आहे, आता विचार करा जर 10 वर्षांपासून एखाद्याला जोडीदार मिळालाच नाही आणि त्याला एकटं राहणं भाग पडलं तर त्याचे आयुष्य किती रंगहीन होईल? साहजिकच ते कोणासाठीही खूप दुःखी बाब असेल. मरीनलँड अॅम्युझमेंट पार्कमध्ये व्हेल माशाचा एकटेपणा पाहिल्यानंतर तुम्हाला एकटेपणा किती वाईट असतो हे अधिक चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल.
कॅनडाच्या मरिनलँड अॅम्युझमेंट पार्कमध्ये राहणाऱ्या व्हेल माशाचा व्हिडीओ गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये व्हेल रागाच्या भरात जवळच्या टाकीच्या एका कोपऱ्यावर डोकं आपटताना दिसत आहे. 30 सेकंदांची ही क्लिप पाहून तुम्हालाही दुःख होईल आणि तुम्ही या माशाच्या हृदयाची स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कराल. खरं तर, हा व्हेल बऱ्याच काळापासून एकटी राहते आहे , ही व्हेल 2011 पासून कॅनडाच्या मरिनलँड पार्कमध्ये एकट्या टाकीमध्ये बंद आहे.
पाहा खास व्हिडीओ
This video was taken on Sept 4th, 2021. Anti-captivity activists entered MarineLand and observed Kiska, their last surviving orca bashing her head against the wall. Please watch and share. This cruelty must end. #FreeKiska pic.twitter.com/uKCxF1AScz
— Phil Demers (@walruswhisperer) September 8, 2021
कार्यकर्ते फिल डेमर्स यांनी व्हेलचा हा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये या व्हेल माशानं पाण्याच्या टाकीवर डोकं आपटल्याचा व्हिडीओ पाहून लोकांना तिचा एकटेपणा जाणवतो आहे. अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की ती एकटी असल्यामुळे तणावाखाली आली आहे. कॅनेडियन प्रेसच्या मते, अॅनिमल वेल्फेअर सर्व्हिसनं तपास केल्यावर असं आढळले की या उद्यानात बहुतेक प्राणी आजारी आहेत. या व्हेलचा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात भावूकही झाले आहेत. व्हेलच्या या वेदना पाहून अनेकांनी त्याला मुक्त करण्याची मागणी करण्यास आता सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या
शेकडो किलोचे ओंडके ट्रकवर चढवण्यासाठी मजुरांची ‘आयडियाची कल्पना’, टीमवर्क पाहून नेटकरीही आवाक
बदकाच्या पिलाच्या मदतीला जेव्हा छोटासा कुत्रा येतो, नेटकरी म्हणाले, ‘माणसं हे कधी शिकणार?’
Video | मुलाला रडण्यासाठी जबरदस्ती, लाईकसाठी महिलेचा कारनामा, व्हिडीओ व्हायरल झाल्याने ट्रोल