Viral Video: कल्पना शक्तीच्या जोरावर सस्ता आणि टिकाऊ बुलडोझर!
हा व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर इंजिनिअरिंग इन्व्हेंशन नावाच्या पेजने शेअर केला असून तो झपाट्याने व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा बुलडोझर वापरताना दिसतोय.
लोकांकडे खूप कल्पना असतात. या कल्पना शक्तीच्या (Imagination) जोरावर ते काहीही करू शकतात. एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक लाकडी बुलडोझर दिसून येतोय. सस्ता आणि टिकाऊ बुलडोझर तुम्हालाही नक्की आवडेल. हे जग कलाकारांनी भरलेलं आहे. नाविन्यपूर्ण लोकांची इथे कमतरता नाही. रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. नुकतंच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुलाने लाकडी दांड्यांनी तात्पुरता बुलडोझर (Wooden Bulldozer) बनवला आहे.
ट्विटरवर व्हायरल होतोय व्हिडिओ
हा व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर इंजिनिअरिंग इन्व्हेंशन नावाच्या पेजने शेअर केला असून तो झपाट्याने व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा बुलडोझर वापरताना दिसतोय. लाकडाने बनविल्यामुळे हा बुलडोझर तात्पुरता आहे पण खूपच इनोव्हेटिव्ह आहे.
तात्पुरता बुलडोझर वापरताना दिसत आहे, जो त्याने लाकडी काठीने डिझाइन केला होता. त्यात माती खणण्यासाठी लागणारे लीव्हर्स होते आणि त्या मुलाला बसायलाही जागा होती.
? Engineering ? pic.twitter.com/xcAiWelipW
— Engineering Inventions (@engineering_i0) September 2, 2022
हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. पण लोक मुलाच्या क्रिएटिव्ह डिझाइनचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. तर काही लोकांना हे पाहून खूप आश्चर्य वाटतंय.