Video : लग्नात पनीरवरून राडा, एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या, भर मंडपात…

लग्न म्हटलं की मानापमान, रुसवे-फुगवे हे आलेच. कधी वराकडचे रुसतात, तर कधी वधूकडच्या लोकांनाही एखादी गोष्ट आवडत नाही. पण अशा गोड-आंबट क्षणांना लग्न समारंभ पार पडतो आणि नवदांपत्याला आशिर्वाद देऊन लोक मस्त जेवायला जातात. पण एखाद्या लग्नात जेवणावरूनच राडा झाला तर

Video : लग्नात पनीरवरून राडा, एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या, भर मंडपात...
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 10:25 AM

Viral Video : लग्न म्हटलं की मानापमान, रुसवे-फुगवे हे आलेच. कधी वराकडचे रुसतात, तर कधी वधूकडच्या लोकांनाही एखादी गोष्ट आवडत नाही. पण अशा गोड-आंबट क्षणांना लग्न समारंभ पार पडतो आणि नवदांपत्याला आशिर्वाद देऊन लोक मस्त जेवायला जातात. पण एखाद्या लग्नात जेवणावरूनच राडा झाला तर ?

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय जेथे लग्नात जेवणावरून, तेही स्पेशली पनीरवरून मोठा राडा झाला. साध्या मुद्यावरून सुरू झालेला वाद बघता, बघता एवढा पेटला की लग्न मंडपाला युद्ध भूमीचं स्वरूप आलं. तो अक्षरश: कुस्तीचा आखाडाच बनला होता.

एका लग्नातील जेवणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये लग्नासाठी आलेली लोकं एकमेकांवर खुर्च्या फेकताना, मारामारी करताना दिसत आहेत. तर काही लोकांनी एकमेकांची थेट कॉलरच पकडली.

पनीरच्या भाजीवरून झाला राडा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मटर-पनीरच्या भाजीवरून राडा झाला. वर आणि वधू या दोघांकडचे नातेवाईक एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. मटरपनीरची भाजी मिळाली नाही म्हणून ते एकमेकांवर धावून गेले आणि त्यांच्यातील वाद पेटला. थोड्या वेळाने तर त्यांचं भांडण एवढं टोकाला गेलं की मारहाण सुरू झाली. काहींनी तर एकमेकांवर खुर्च्याच फेकून मारल्या.

पनीर आणि मटरवरून नवरा-नवरीकडचे पै पाहुणे आमनेसामने आले आणि जोरदार हंगामा झाला. जेवणामध्ये पनीर मिळाले नाहीत म्हणून एकमेकांवर धावत जाऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण इतकी टोकाला गेली की, खुर्च्या उचलून एकमेकांच्या डोक्यात घालण्यात आल्या.

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र बऱ्याच कमेंट्स केल्या. हा वाद नेमका कशासाठी झाला, हे जाणून घेण्याची लोकांना बरीच उत्सुकता होती. हा व्हिडीओ कोणता आहे, वाद का झाला असे एक नाही असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.पनीरमुळे आता तिसरं महायुद्ध पेटलंय, अशी कमेंट एकाने केली. तर लग्नात पनीर मिळालं नाही म्हणून खुर्च्यांची मोडतोड करून पैसे वसूल करत आहेत, अशी कमेंट दुसऱ्याने केली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.