चांगले चिकन मिळाले नाही, मग पत्नीला छतावरून फेकले, हृदयद्रावक VIDEO
Viral News: धक्कादायक बातमीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात पत्नीने चांगले चिकन बनवले नाही, यामुळे त्या व्यक्तीने तिला छातावरुन खाली फेकून दिल्याचा दावा केला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानमधील असल्याचे म्हटले जात आहे.
अनेक जणांना स्वादिष्ट जेवण आवडत असते. चांगले खाण्यासाठी मिळावे, यासाठी लोक घरापासून लांब असणाऱ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी जातात. खवय्यांना आपल्या शहरातीलच नाही तर दुसऱ्या शहरातील खाण्याची चांगली ठिकाणे माहिती असतात. उत्तर प्रदेशातील डॉन मुख्तार अन्सारी याचे नुकतेच निधन झाले. परंतु त्याच्या किस्यांची चर्चा सुरु आहे. तो कारागृहात असताना त्याने त्याच्या खाणसामाला एखाद्या गुन्ह्याखाली अडकवले. त्यानंतर तोही कारागृहात आला. तो मुख्तार अन्सारीसाठी कारागृहात चांगले जेवण बनवत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु धक्कादायक बातमीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात पत्नीने चांगले चिकन बनवले नाही, यामुळे त्या व्यक्तीने तिला छातावरुन खाली फेकून दिल्याचा दावा केला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानमधील असल्याचे म्हटले आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
काय आहे त्या व्हिडिओत
सोशल मीडिया प्लेटफॉर्म ट्विटरवर @ZafarHeretic अकाउंटवरुन व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. १८ सेंकदाच्या या व्हिडिओत एक महिला छतावरुन खाली पडताना दिसत आहे. छतावरुन पडल्यानंतर तिला प्रचंड वेदना होत आहे. त्यानंतर शेजारचे लोक तिच्या मदतीसाठी धावून आलेले दिसतात. युजरने म्हटले आहे की, या महिलेने चांगले चिकन बनवले नाही, यामुळे तिच्या पतीने तिला खाली फेकले आहे. चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
Pakistani muslim man throws wife out of the window for not spicing the chicken properly. Why has islam failed to instill morality and humanity into them? pic.twitter.com/GDBSl4ZJT9
— Zafar Heretic (@ZafarHeretic) March 30, 2024
हजारो लोकांनी केले लाईक
हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की ‘हा भयानक प्रकार आहे’, दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की ‘यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, कारण या प्रकारच्या समस्येकडे कधीही दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही’, आणखी एक युजर म्हणतो ‘पाकिस्तान असे प्रकार सामान्य आहे.’