मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवताय पैसे? हा व्हिडिओ नक्की पहा, Clip Viral
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अनामिका नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. तीन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून त्यावर कमेंट आणि प्रतिक्रिया देत आहेत. जर तुम्ही पैशाची एखादी नोट मोबाईलच्या मागे ठेवत असाल तर हा व्हिडीओ फक्त तुमच्यासाठी आहे. व्हिडीओ बघून तुम्ही पुन्हा कधीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवणार नाही.
मुंबई: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे याचा फायदा अनेक लोकांकडून घेतला जातो. व्हिडीओ देखील एकाच प्रकारचे नसतात. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत राहतात. कधी प्राण्यांचे, कधी पक्ष्यांचे, कधी लहान मुलांचे तर अजून कशाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता हाच व्हिडीओ बघा, हा व्हिडीओ एकदम हटके आहे. या व्हिडीओ मध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही पैशाची एखादी नोट मोबाईलच्या मागे ठेवत असाल तर हा व्हिडीओ फक्त तुमच्यासाठी आहे. व्हिडीओ बघून तुम्ही पुन्हा कधीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवणार नाही.
हा व्हिडीओ बघा…
फोन गरम होतो असं तुम्ही नेहमी ऐकलं असेल, हो ना? हे माहित असून सुद्धा लोक या गोष्टीकडे लक्ष देतात. अनेकदा एका फोनवर दुसरा फोन ठेवलेला असतो, वरच्या खिशात हृदयाजवळ फोन ठेवलेला असतो, डोक्याजवळ फोन ठेवलेला असतो. फोन गरम होऊन फुटतो या गोष्टीकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो. आता आपल्या लक्षात राहत नाही किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण याने नुकसान होतं हे मात्र नक्की. हा व्हिडीओ बघा…
View this post on Instagram
व्हिडीओ खूप धक्कादायक
या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने आयफोनच्या मागे 500 रुपयाची नोट ठेवलीये. व्हिडीओ सुरु असताना वर आयफोन च्या मागची नोट जळल्याचं सुद्धा दिसतंय. हा व्हिडीओ खूप धक्कादायक आहे. आपण पैसे ठेवताना इकडे-तिकडे ठेवण्यापेक्षा फोनच्या कव्हर मध्ये ठेवतो. आपल्याला वाटतं होऊन-होऊन काय होऊ शकतं? व्हायरल व्हिडीओ मध्ये सांगण्यात आलंय की जेव्हा फोनचा प्रोसेसर खूप वेगाने काम करतो तेव्हा फोन गरम होतो. फोन इतका गरम होतो की फोनला आग लागू शकते. फोनच्या मागे जी नोट ठेवलेली असते ती नोट बनवताना केमिकल्सचा वापर करण्यात आलेला असतो त्यामुळे ही नोट सुद्धा पटकन पेट घेऊ शकते. या व्हिडीओमधून तुम्हाला बरीच माहिती मिळेल.