viral video : इको फ्रेंडली ऊसाचा रस काढणारी मशिन, कमी मनुष्यबळात झटपट रस
ऊसाच्या या नविन मशिनमध्ये ऊसाला वारंवार स्पर्श न होता स्वच्छता राखली जाते. तसेच पारंपारिक मशिनची मोटर डीझेलवर चालविली जाते. त्यामुळे प्रदूषण होत असते. परंतू नविन मशिन इकोफ्रेंडली आहे.
मुंबई : आपण ऊसाचा रस काढणाऱ्या अनेक मशिन पाहील्या असतील. या मशिनला डीझेल किंवा इलेक्ट्रीकवर चालणारी मोटर लावलेली असते. परंतू आता बाजारात ऊसाचा रस काढणारी नविन इलेक्ट्रीक शुगरकेन मशिन ( Electric Sugarcane Juice ) आली असून त्याद्वारे झटपट सोप्या पद्धतीने ऊसाचा रस निघत असून त्यामुळे कमी मनुष्यबळात इको फ्रेंडली पद्धतीने ऊसाचा रस मिळत आहे. विशेष म्हणजे या मशिनद्वारे विना मानवी स्पर्श शुद्ध रस मिळत असल्याने या मशिनला मागणी वाढणार आहे.
ऊसाच्या पारंपारिक मशिनमध्ये ऊसांच्या कांड्या मशिनमध्ये टाकताना हातांचा स्पर्श वारंवार करून त्या ऊसाला मोटरच्या चरक्यात वारंवार पिळावे लागते. त्याला वारंवार हाताचा स्पर्श होत असल्याने स्वच्छता राखली जात नाही. परंतू या मशिनमध्ये ऊसाला वारंवार स्पर्श न होता स्वच्छता राखली जाते. तसेच पारंपारिक मशिनची मोटर डीझेलवर चालविली जाते. त्यामुळे प्रदूषण होत असते. या नव्या मशिनची मोटर इलेक्ट्रीकवर चालत असल्याने प्रदूषण टळण्यास मदत होते.
येथे पाहा व्हिडीओ
Innovative आत्मनिर्भर India pic.twitter.com/TngLFM9lWv
— Aviator Anil Chopra (@Chopsyturvey) May 11, 2023
या हायटेक ऑटोमेटेड ऊसाच्या मशीनचा हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे. सेवानिवृत्त एअर मार्शल (IAF), अनिल चोप्रा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर टाकला आहे, ज्यामध्ये ज्यूस काढणारी व्यक्ती मशीनची काही बटणं दाबून तुम्हाला अवघ्या काही मिनिटांतच रस काढून देत आहे.ऊसाचा रस काढणारी ही व्यक्ती केवळ मशिनचे एक झाकण उघडून त्यात ऊस टाकताना दिसत आहे. त्यानंतर तो पुन्हा त्या ऊसाला स्पर्श करीत नाही. तो ऊस संपूर्णपणे आपोआप मशिनच्या आत खेचला जातो. त्यानंतर एका नळाखाली तो मनुष्य केवळ ग्लासात चाट मसाला टाकून तो ग्लास त्या नळाखाली धरतो आणि थेट ज्यूस ग्लासात पडताना दिसत आहे.