बजाजच्या ‘क्लासिक’ स्कूटरवर बसलेले एक वयस्कर चाचा! एकदा बघाल, पुन्हा पुन्हा बघाल…

हे ऐकायला सुद्धा इतकं सुंदर आहे की कुणी गरज म्हणून नाही पण ते विकण्याची पद्धत छान आहे म्हणून प्रभावित होऊन विकत घेऊ शकतं. हा व्हिडीओ तुम्ही पाहिलाच हवा...

बजाजच्या 'क्लासिक' स्कूटरवर बसलेले एक वयस्कर चाचा! एकदा बघाल, पुन्हा पुन्हा बघाल...
Bhopal Viral VideoImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 11:40 AM

भारतात लोकांकडे व्यवसायासाठी अजब गजब टॅलेंट (Indian Talent) आहे. लोकं काय शक्कल लावतील, कसा त्यांचा व्यवसाय चालवतील ह्याचा काहीच नेम नसतो. मध्ये कच्चा बादामचं एक गाणं आलं होतं. त्या गाण्यात बदामाचं वर्णन होतं. बरेचदा बाजारातील व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत असतात ज्यात लोकं एकमेकांशी स्पर्धा करत असतात. खरं तर भारतातील लोकंच जर हटके (Unique Style) असतील तर एखादी गोष्ट विकण्यासाठी सुद्धा तितक्याच ताकदीची आयडिया लागते. आता हा व्हिडीओच बघा. या व्हिडीओत हे आजोबा नमकीन विकतायत. मग ते छान पद्धतीने चाल लाऊन ते नमकीन (Viral Video Bhopal) विकताना दिसून येतायत. हे ऐकायला सुद्धा इतकं सुंदर आहे की कुणी गरज म्हणून नाही पण ते विकण्याची पद्धत छान आहे म्हणून प्रभावित होऊन विकत घेऊ शकतं. हा व्हिडीओ तुम्ही पाहिलाच हवा…

हा व्हिडीओ भोपाळ मधला आहे

45 सेकंदांचा हा व्हिडीओ. काहीच वेळात तुमच्या मनावर राज्य करू शकतो. बजाजच्या ‘क्लासिक’ स्कूटरवर बॅग घेऊन बसलेला एक वयस्कर चाचा आपल्याला दिसतो.

वय आणि स्वॅग याचा परस्परांशी काहीच संबंध नसतो हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे. त्याच्याकडे या वयातसुद्धा एक वेगळाच स्वॅग आहे.

त्याने एक टोपी घातली आहे, ज्यावर बॉय लिहिले आहे. एवढेच नव्हे तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ज्या पद्धतीने आवाज काढतो ते ऐकून संपूर्ण इंटरनेटच त्याचे फॅन झाले आहे!

हा व्हिडिओ २ सप्टेंबर रोजी @manishbpl1 ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलाय. कॅप्शनमध्ये लिहिलंय – भोपाली नमकीन वाला. भोपाळमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. पहा की जनाब किती आश्चर्यकारकपणे नमकीन विकत आहे!

“ती…ती…ती…तीस रुपये के नमकीन”

भोपाळचा हा व्हिडीओ “कच्चा बदाम” सारखाच फेमस झालाय. यात हे आजोबा नमकीनची किंमत सांगताना,”ती…ती…ती…तीस रुपये के नमकीन” असं एकदम गाडीचा हॉर्न वाजविल्यासारखं म्हणतायत. त्यांच्याकडे नमकीन मध्ये कोणते वेगवेगळे प्रकार आहेत हेही ते एकदम अनोख्या पद्धतीनं सांगतायत.

या व्हिडीओला एक हजाराहून अधिक लाईक्स आणि सुमारे दोनशे रिट्विट मिळाले आहेत. तर चाचांची क्लिप तीस हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.