VIDEO: पावसात भिजत होती कोंबडीची पिल्लं, आईने असं काही केलं की तुम्ही विचारही नाही करू शकत
आई माणसातली असो किंवा पक्षांमधली आणि प्राण्यांमधली. आईची व्याख्या सगळीकडे सारखीच आहे. तिच्या मायेला कुठलीही सीमा नाही.
मुंबई : जगात फक्त आई (Mother) ही एकमेव अशी मनुष्य (Human) आहे जी आपल्या लेकरांच्या सुखासाठी काहीही करायला तयार असते. नऊ महिने आपल्या पोटात वाढवून ती आयुष्यभर आपल्या बाळाचं (Children) संगोपन करते. यातच तिचा आनंद असतो. आता ही आई माणसातली असो किंवा पक्षांमधली आणि प्राण्यांमधली. आईची व्याख्या सगळीकडे सारखीच आहे. तिच्या मायेला कुठलीही सीमा नाही. याचाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हीडिओ पाहुन तुम्हाला आईच्या मायेचा अंदाज येईल. (Viral video hens save children who raining in the rain video goes viral on social media)
तुम्ही या व्हीडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे कोंबडी तिच्या पिल्लांना पावसापासून वाचवते. तिने ज्यापद्धतीने आपल्या मुलांचं रक्षण केलं खरोखरच हे कौतुकास्पद आहे. हा व्हीडिओ पाहिल्यानंतर आपल्यासाठी आपल्या आईने किती केलं हे तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
Because she is a mother! pic.twitter.com/y5WhwihmFG
— Sudha Ramen IFS ?? (@SudhaRamenIFS) January 20, 2021
हा व्हीडिओ भारतीय वन सेवेतील अधिकारी सुधा रमण यांनी त्यांच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. हा शेअर करताना त्यांनी लिहलं की, ‘कारण.. ती एक आई आहे.’ सोशल मीडिया या व्हीडिओला नेटकऱ्यांनी खूप प्रेम दिलं आहे. व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोंबडी पावसात उभी राहून आपल्या पखांनी पिल्ल्यांचं रक्षण करते.
पिल्ल्यांना पावसापासून वाचवण्यासाठी तिने आपल्या पंखांचीच छत्री केली आणि पिल्लांना झाकून घेतलं. आईचं लेकरांसाठीचं हे प्रेम पाहून नेटकरीही खूश झाले आहे. त्यामुळे हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत आहे.
कोंबडीचा हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून लोकांनी याचं कौतूक केलं आहे. हा व्हीडिओ सुधा रमण यांनी 20 जानेवारीच्या रात्री शेअर केला होता. ज्याला आतापर्यंत 45 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर या व्हीडिओला पाच हजार 900 लाईक्स असून आतापर्यंत 846 वेळा नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. (Viral video hens save children who raining in the rain video goes viral on social media)
संबंधित बातम्या –
Trending | रात्री सहज उठला आणि बनला 75 कोटींचा मालक, जाणून घ्या संपूर्ण कहाणी
‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या संचालिका नताशा पूनावालाही सोशल मीडियावर चर्चेत, वाचा त्यांच्याविषयी…
एका क्षणात झाला करोडपती! मच्छिमाराच्या हाती काय लागलं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल
(Viral video hens save children who raining in the rain video goes viral on social media)