Video: हायना-सिंहाची लढाई, पाहा कोण विजयी, कोण पराभूत, नेटकऱ्यांना धक्का देणारा व्हिडीओ

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एका सिंहाने हायनाला आपल्या तावडीत पकडलेलं आहे. पर्यटक हे सगळं आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. हायना मोठ मोठ्याने ओरडत आहे.

Video: हायना-सिंहाची लढाई, पाहा कोण विजयी, कोण पराभूत, नेटकऱ्यांना धक्का देणारा व्हिडीओ
तरस आणि सिंहाची लढाई
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 10:49 AM

जंगलातील सर्वात खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक हायना म्हणजे तरस आणि सिंहाची समजा लढाई झाली, तर कोण जिंकेल? तुम्हाला काय वाटतं? अनेकांना सिंहच जिंकेल असं वाटेल, पण अनेक व्हिडीओंमध्ये असं दिसतं की, हायना सिंहापेक्षाही कमी नाही. अनेकचा शिकारीवरुन झालेल्या भांडणात सिंहाला माघार घ्यावी लागते. मात्र, दरवेळी हे होत नाही, कधी कधी सिंहाच्या तावडीत एखादा हायना सापडला तर त्याची काय अवस्था होऊ शकते, हेच आपण आजच्या व्हिडीओतून पाहणार आहोत. (Viral Video Hyena lion fight, each other badly know who wins the game, Who Win what you think)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एका सिंहाने हायनाला आपल्या तावडीत पकडलेलं आहे. पर्यटक हे सगळं आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. हायना मोठ मोठ्याने ओरडत आहे. मात्र, तोही हार मानायला तयार नाही. तितक्यात हायना या लढतीत आघाडी घेतो आणि सिंहाला पकडतो. काहीक्षण हायना सिंहावर भारी दिसतो. सिंह खाली पडलेला दिसतो. पण म्हणतात ना सिंह सिंहच असतो. सिंह क्षणांत ही बाजी पलटतो, हायनाला असं काही पकडतो की त्याचा जीव घशात येतो. हायना काय करावं सूचत नाही. या परिस्थितीतून निसटणंच हायनाला योग्य वाटतं, आणि तो बरोबर वेळ पाहून सिंहापासून लांब पळतो.

तुमच्या माहितीसाठी हायनाचा बाईट म्हणजे चावणं सर्वात शक्तीशाली असतं. तो शिकारीवर लावत असलेला बाईट फोर्स हा जगात सर्वात जास्त आहे, अगदी सिंह आणि वाघाहूनही कित्येक पटीने जास्त. त्याच्या जबड्यांची रचना आणि चावण्याची पद्धत इतकी शक्तीशाली आहे की, क्षणांत हाडांचा चुरा करु शकते. अगदी पाण्यातील मगरीच्या बरोबर, त्यामुळे या व्हिडीओत सिंह कुणाशी भिडला आहे, आणि त्यानंतर त्याला काय त्रास झाला असेल याची कल्पना तुम्हीच करा.

व्हिडीओ पाहा:

हा 2 मिनिट 26 सेकंदाचा व्हिडिओ आफ्रिकन बुश किंगडमने फेसबुकवर आपल्या पेजवर शेअर केला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सिंह आणि हायना हे एकमेकांचे शत्रू आहेत. सिंहाच्या बलाढ्य जबड्यातून हायना कसा सुटतो ते पाहा.

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे की, ‘हा जंगलाचा नियम आहे, इथे कोण विजयी होईल हे कोणालाच माहीत नाही.’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे की, ‘दोघेही खूप शक्तिशाली प्राणी आहेत, मला या लढ्यातून असं वाटतं की दोघांनाही गंभीर दुखापत झाली असेल.’ त्याचवेळी, आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘हायनामध्ये अप्रतिम ऊर्जा आहे, म्हणूनच ती सिंहासमोर इतका वेळ उभी राहू शकला.’

हेही पाहा:

Video: ‘घोडे शर्यतीत धावतात, एकमेकांवर नाही’, हे वाक्य खोटं करुन दाखवणारा भन्नाट व्हिडीओ, पाहा 2 घोड्यांची लढाई!

Video:कुत्र्याचा थेट सिंहावर हल्ला, सिंहाचा काढता पाय, नेटकरी म्हणाले, आपल्या गल्लीत प्रत्येक कुत्रा सिंहच असतो!

 

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.