Viral Video: काहीच मिनिटांत रस्त्याची नदी झाली आणि नदीवर पूल आला, व्हिडीओ बघून लोकं खुश!

खरं तर जग सुंदर बनविण्याचं काम खऱ्या अर्थानं कुणी करत असेल तर ते आहेत कलाकार लोकं. असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील जे बघून तुम्हाला वाटेल अरेच्चा! हे असं कसं?

Viral Video: काहीच मिनिटांत रस्त्याची नदी झाली आणि नदीवर पूल आला, व्हिडीओ बघून लोकं खुश!
3D Art Viral VideoImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 10:25 AM

आपण बघत राहावं आणि कलाकारानं दाखवत राहावं! आपण ओंजळीत घ्यावं, कलाकाराने (Artist) देत जावं! असा असतो कलाकार आणि हे असतं कलाकाराचं महत्त्व. या जगात कलाकारांची कमतरता नाही. अद्भुत कलात्मकता दाखवणारे एकापेक्षा एक कलाकार आहेत. काही जण आपल्या भन्नाट पेंटिंग्जने, तर कुणी आपल्या विविध प्रकारच्या कलाकृतींनी लोकांना आश्चर्याचा धक्का देतात. खरं तर जग सुंदर बनविण्याचं काम खऱ्या अर्थानं कुणी करत असेल तर ते आहेत कलाकार लोकं. असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील जे बघून तुम्हाला वाटेल अरेच्चा! हे असं कसं? सोशल मीडियावरही (Social Media) अनेकदा चित्रकला आणि कलेशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात, हे पाहिल्यानंतर तोंडातून फक्त ‘वॉव’ बाहेर पडतं. आजकाल असाच एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral)  होत आहे, ज्यामध्ये एका कलाकाराने रस्त्यावर अशी अफलातून कला साकारली आहे की ते पाहून तुम्हीही फसाल.

थ्री-डी आर्ट

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने रस्त्याच्या मधोमध काही रेषा रेखाटल्या आहेत आणि मग तो त्या रेषांना रंग देतो. मग काही सेकंदात तो रस्त्यावर इतकं सुंदर चित्र काढतो की जणू काही त्याने कालवा बनवला आहे, त्यात पाणीही वाहतंय असं वाटतं. तसेच ‘कालव्या’च्या मध्यभागी तो एक रेषा काढतो, जो नंतर दिसताना पूल असल्यासारखा भासतो. अशा कलेला खरे तर थ्री-डी आर्ट म्हणतात, जी हुबेहूब खरीखुरी दिसते, म्हणजे डोळ्यांना गोंधळात टाकते. संपूर्ण व्हिडिओ पाहिला नाही, फक्त तो ‘कालवा’ पाहिला नाही, तर ती एक कला आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

क्रेझी आर्ट

हा नेत्रदीपक आर्ट व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आर्ट वर्ल्ड नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. 34 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाख 10 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर 17 हजारांहून अधिक लोकांनीही हा व्हिडिओ लाईक करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला ‘कूल’ तर काहींनी ‘क्रेझी आर्ट’ म्हटले आहे. त्याचबरोबर एका युझरने लिहिले आहे की, ‘अमेझिंग आर्टिस्ट है’, तर दुसऱ्या युझरने ‘हे शानदार आहे’, असे म्हटले आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.