Viral: सिंहाला हात लावण्यासाठी खिडकी उघडली, आणि त्यानंतर जे झालं त्याने तुमच्या अंगावर काटा येईल!

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पर्यटक बसची खिडकी उघडून सिंहाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या हातात कॅमेराही आहे. सुरुवातीला सिंह काही करत नाही, पण दुसऱ्याच क्षणी तो संतप्त होतो

Viral: सिंहाला हात लावण्यासाठी खिडकी उघडली, आणि त्यानंतर जे झालं त्याने तुमच्या अंगावर काटा येईल!
बसची खिडकी उघडून सिंहाला स्पर्श करण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 5:39 PM

सध्या सोशल मीडियावर एका पर्यटकाचा व्हिडिओ खूप पाहिला जात आहे. व्हिडिओमध्ये हा पर्यटक राष्ट्रीय उद्यानात बसमध्ये बसलेला दिसत आहे. बस सिंहाजवळ येताच, पर्यटक खिडकी उघडतो आणि त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान, सिंहाच्या हल्ल्यातून व्यक्ती थोडक्यात बचावते. पर्यटकाच्या या कृत्याबद्दल लोक सोशल मीडियावर पर्यटकावर जोरदार टीका करत आहेत. अनेक युजर्सनी या पर्यटकाचे आतापर्यंतचे सर्वात मूर्ख व्यक्ती असं वर्णन केले आहे. (Viral Video in Africa National Park Tourist opened the bus window to touch and take picture of a lion see what happened next animal attack)

हा व्हिडिओ Maasai Sightings ने YouTube वर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आफ्रिकेतील सेरेनगेटी नॅशनल पार्कमध्ये शूट करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पर्यटक बसची खिडकी उघडून सिंहाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या हातात कॅमेराही आहे. सुरुवातीला सिंह काही करत नाही, पण दुसऱ्याच क्षणी तो संतप्त होतो आणि पर्यटकावर रागाने डरकाळी फोडतो. यामुळे पर्यटक घाबरतो आणि पटकन खिडकी बंद करण्याचा प्रयत्न करतो. व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की सिंहाने खिडकीतूनच हल्ला केला असती तर व्यक्तीची काय हालत झाली असती. हे दृश्य खरोखरच भयावह आहे.

चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहूया.

मसाई साइटिंग्जने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हे अत्यंत मूर्खपणाचे कृत्य आहे. असे करून तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालता. याशिवाय नॅशनल पार्क तुमच्यावर बंदी आणू शकते. हा व्हिडिओ जवळपास सहा लाख वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. लोक या पर्यटकावर जोरदार टीका करत आहेत.

पर्यटकाच्या मूर्खपणाबद्दल लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. एका यूजरवर कमेंट करताना त्याने लिहिले की, “मला या व्यक्तीऐवजी सिंहाबद्दल वाईट वाटत आहे, कारण तो अशा मूर्ख पर्यटकाला पकडण्यात चुकला. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले आहे की, हा आतापर्यंतचा सर्वात मूर्ख पर्यटक आहे.

हेही पाहा:

Video: कित्येक फूट लांब, आणि शेकडो किलोचा अजगर पाठीवर, सर्पमित्राचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल!

Viral Video: लिफ्टमध्ये कुत्र्याचा पट्टा अडकला, त्याला फास बसला, आणि त्यानंतर जे घडलं त्याने नेटकरी अवाक!

 

वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.