Video | थरारक! भाऊ पाचव्या मजल्यावर आगीत अडकला होता, बहिणीच्या धाडसामुळे थोडक्यात वाचला

आपल्या जिवाची पर्वा न करता, प्रसंगावधान आणि धाडस दाखवत एक मुलगी आधी पाईपावर लटकून उभी असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. पाईपावरुन तिनं आपल्या भावाला रुमच्या खिडकीत येण्यासाठी आवाज दिला. यानंतर घाबरलेल्या 13 वर्षांच्या मुलानं खिडकीत येत बहिणीला सादही दिली.

Video | थरारक! भाऊ पाचव्या मजल्यावर आगीत अडकला होता, बहिणीच्या धाडसामुळे थोडक्यात वाचला
Source - Twitter
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 4:18 PM

अमेरिका : तुम्हाला मुंबईच्या अविघ्न पार्कमध्ये (Mumbai Avighna Park Fire) हल्लीच लागलेली आग आणि या आगीतून जीव वाचवण्यासाठी एकानं बाल्कनीतून उडी टाकल्याचा व्हिडीओ आठवत असेल. यात जीव वाचवण्यासाठी उडी टाकलेला तरुण दगावला होता. पण अशीच काहीशी घटना अमेरिकेतही घडली. अमेरिकेत इमारतीला लागलेल्या आगीतून जीव वाचवण्यासाठी दोघा बहीण-भावंडांनी जे केलं, त्याची चर्चा सध्या सोशल मीडियात पाहायला मिळतेय. न्यूयॉर्कमधून (New York) एक थरारक व्हिडीओ (Video) समोर आला आहे. एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग (Fire) लागली होती. या आगीचा सामना करत एका धाडसी बहिणीनं आपल्या लहान भावाचा जीव वाचवला आहे. या संपूर्ण थरारक घटनेचा व्हिडीओ एका मोबाईल कॅमेऱ्यात (Mobile camera) टिपला गेलाय. एखाद्या सिनेमाच्या (Movie) ऍक्शन सीनलाही (Action Scene) लाजवेल असं धाडस न्यूयॉर्कमधील एका बहिणीनं दाखवलंय.

New York Fire Rescue Video

Source – Twitter

काय केलं तिनं?

न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमधील ईस्ट विलेजमध्ये असलेल्या ‘एव्हेन्यू डी’ या इमारतीमध्ये अचानक आग भडकली. सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही आग भडकली होती. या आगीतून स्वतःला वाचावण्यासाठी एक 18 वर्षांची मुलगी चक्क खिडकीचा आधार घेऊन बाहेर पाईपावर लटकली. पण आपला भाऊही आगीत अडकल्याचं बघून या बहिणीनं खिडकीला लटकत आपल्या भावालाही आगीतून सुखरुप बाहेर काढलंय.

New York Video Fire rescue

Source – Twitter

कसं वाचवलं भावाला?

आपल्या जिवाची पर्वा न करता, प्रसंगावधान आणि धाडस दाखवत एक मुलगी आधी पाईपावर लटकून उभी असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. पाईपावरुन तिनं आपल्या भावाला रुमच्या खिडकीत येण्यासाठी आवाज दिला. यानंतर घाबरलेल्या 13 वर्षांच्या मुलानं खिडकीत येत बहिणीला सादही दिली. पण परिस्थिती अशी होती की, ते पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारु शकत नव्हते. तसं केलं असतं, तर त्यांचा जीवच गेला असता. शिवाय खाली असलेल्या चौथ्या मजल्यावर आग भडकली होती.

Fire Rescue

Source – Twitter

अखेर बहिणीनं शर्थीचे प्रयत्न केले आणि भावाला खिडकीच्या बाहेर काढलं. खिडकीच्या बाहेर काढून तिनं भावाला आपल्या पाठीवर घेतलं आणि पाईपावरुन ती हळूहळू खाली उतरली. न्यूयॉर्कमधील या धाडसी बहिणीनं केलेल्या साहसी कामगिरीचं सगळ्यांनी कौतुक केलंय. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून या मुलीच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय.

कशामुळे आग लागलेली?

इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीमुळे आग भडकली असल्याचं नंतर तपासातून समोर आलंय. इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यूही झाला असून या दुर्घटनेतून बहीण-भाऊ बालंबाल बचावलेत.

पाहा न्यूयॉर्कमधील घटनेचा व्हिडीओ –

इतर ट्रेन्डिंग बातम्या –

Video | Hair cutting | तुम्ही म्हणाल ही तर ‘गॉन केस’? पण तसं नाहीए, शिवा 20 कैच्या हातात घेऊन कापतो केस

Video | भर लग्नमंडपातच नवरीमुलीकडच्यांनी नवऱ्याला आधी धू-धू धुतलं, नंतर पोलीस स्टेशनमध्येही खेचलं!

Video | अंतयात्रेत Ice-cream vanची का लागली रांग? कारण ऐकाल तर आईस्क्रिमसारखेच विरघळून जाल

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.