Mere Rashke Qamarवर छोट्या उस्तादची बोटं तबल्यावर थिरकली! Video पाहून म्हणावंच लागेल ‘वाह, क्या बात है’

Viral Tabla Remake of Mere Rashque Qamar : मेरे रश्के कमर हे गाणं राहत फतेह अली खाननं बादशाहो या सिनेमात गायलं होतं. दरम्यान, त्याआधीच हे गाणं नुसरत फतेह अली खान यांनी गायलेल्या गाण्याचं वर्जन ऐकून अनेकांना या गाण्याच्या प्रेमात पाडलं होतं.

Mere Rashke Qamarवर छोट्या उस्तादची बोटं तबल्यावर थिरकली! Video पाहून म्हणावंच लागेल 'वाह, क्या बात है'
व्हायरल व्हिडीओतील मुलाचा तबला ऐकाला का?
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 4:38 PM

मुंबई : सोशल मीडिया ही भारी गोष्ट आहे. हाच सोशल मीडिया थेरगावच्या क्विनचीही (Thergaon Queen) थेरं दाखवतो. आणि टॅलेंटेड पोरांची स्किलही दाखवतो. प्रत्येक दिवशी वेगवेगळे व्हायरल व्हिडीओ समोर येत असतात. लोकांना कधी काय आवडेल, भावेल, याचाही नेम नाही. आता फेसबुकवरील (Facebook Marathi Page) एका मराठमोळ्या पेजवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलानं मेरे रश्के कमर (Mere Rashke Qamar) या गाण्यावर तबला वाजवला आहे. सोशल मीडियातील या व्हायरल झालेल्या मुलाचा व्हिडीओ अनेकांना भुरळ पाडतोय. या मुलानं तबल्यावर मेरे रश्के कमर गाणं जितकं भारी वाजवलं आहे त्या पेक्षाही या मुलाचे एक्स्प्रेशन्स हे जास्त भारी आहेत. युजर्सनीही या मुलाचं कौतुक केलंय. अजय देवगण आणि अलियाना डिक्रूझवर चित्रित करण्यात आलेलं बादशाहो सिनेमातंल हे गाणंही आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. या गाण्याच्या तबला रिमेकनं चाहत्यांना पुन्हा एकदा प्रेमात पाडलं होतं.

कुणी शेअर केला व्हिडीओ?

सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या या मुलाचा व्हिडीओ शेअर केलाय स्मार्ट सोलापूरकर या पेजवर. गाण्यात तल्लीन झालेल्या या मुलाची बोटं सराईतपणे तबल्यावर थिरकताना दिसून आली आहेत. शिवाय या मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभावही खरतनाकच आहे.

आतापर्यंत 1.7 मिलियनपेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारो लोकांनी या व्हिडीओवर कमेन्ट्सचा पाऊस पाडलाय. तबला वादन ऐकायचं की त्याच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहायचे? अशी पोस्ट करत हा व्हिडीओ फेसबुकवरुन शेअर करण्यात आला आहे. 121 हजार लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय तर 6.2 हजार लोकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

पाहा व्हिडीओ –

मेरे रश्के कमर हे गाणं राहत फतेह अली खाननं बादशाहो या सिनेमात गायलं होतं. दरम्यान, त्याआधीच हे गाणं नुसरत फतेह अली खान यांनी गायलेल्या गाण्याचं वर्जन ऐकून अनेकांना या गाण्याच्या प्रेमात पाडलं होतं. त्यानंतर या गाण्याचं आणखी एक वर्जन अजय देवगनच्या बादशाहो या सिनेमाचही तयार करण्यात आलं होतं. रिलीजनंतर अनेक महिने या गाण्याची जादू चाहत्यांवर पाहायला मिळाली होती.

आता एकदा ओरिजनली ऐकून घ्या…

संबधित बातम्या :

Video Viral : ‘अति घाई संकटात नेई’, ओव्हरटेक करण्याचा बेशिस्त कारचालकाचा प्रयत्न फसला आणि…

Video : ‘या’ पक्ष्यांना पाहून तुम्हीही म्हणाल, ‘ही बटालियन आहे की संपूर्ण सेना!’

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.