Viral Video: भाऊ नशेत चालत्या गाडीच्या छतावर चढले! याची त्याची गाडी नाही, डायरेक्ट पोलिसांची!
तसं म्हणायला इतकी हिंमत माणसाची नशेतच होऊ शकते. नशेतच माणूस डायरेक्ट पोलिसांच्या गाडीवर चढू शकतो आणि तेही शर्ट काढून. ही घटना काही दिवसांपूर्वी रात्री आसिफ नगरमध्ये घडलीये.
कार आणि बाइकवरच्या तरुणाचे स्टंट (Stunt) व्हिडिओ खूप दिसले असतील, जे थांबवण्यासाठी पोलीसही ॲक्शन मोड (Action Mode) मध्ये असतात. पण हैदराबादमधून एक क्लिप समोर आली आहे, जी पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण इथे एक तरुण चक्क पोलिसांच्या चालत्या गाडीच्या छतावर स्वार झालेला दिसलाय. ही व्यक्ती नशेत होती आणि त्याने शर्टही घातला नव्हता, अशी माहिती समोर आलीये. तसं म्हणायला इतकी हिंमत माणसाची नशेतच होऊ शकते. नशेतच माणूस डायरेक्ट पोलिसांच्या (Police) गाडीवर चढू शकतो आणि तेही शर्ट काढून. ही घटना काही दिवसांपूर्वी रात्री आसिफ नगरमध्ये घडलीये.
मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या फिरत्या गाडीवर
हा पोलिसांच्या वाहनावर गोंधळ घालणारा तरुण 20 वर्षांचा आहे, रोजगारावर काम करणारा आणि मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. तो मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या फिरत्या गाडीवर (पेट्रोलिंग व्हेइकल) चढला आणि त्याची विंडशील्ड तोडली. इतकंच नाही तर त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचंही नुकसान केलं. अजय नावाच्या या तरुणाला अनेक आरोपांखाली अटक करण्यात आलीये आणि मंगळवारी (14 जूनला) त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
गाडीची तोडफोड
हा व्हिडिओ 41 सेकंदाचा आहे.तुम्ही पाहू शकता, कथित मद्यधुंद माणूस शर्टशिवाय पोलिसांच्या गस्ती वाहनावर बसला आहे. गाडी वेगाने पुढे सरकत आहे. चालकाने ब्रेक लावताच तो तरुण गाडीच्या बोनेटवर घसरतो. कारच्या बोनेटवरही त्याच्या पावलांचे ठसे दिसू शकतात. इतकंच नाही तर व्हिडिओमध्ये या वाहनाची मागील विंडशील्डही दिसतीये, जी फुटलेली आहे. गाडीची तोडफोड झालेली आहे. ही व्यक्ती वाहनातून खाली उतरताच एका पोलिस कर्मचाऱ्याने त्याला प्लास्टिकच्या काड्यांनी मारहाण केलीये.
ఈ దృశ్యం మన హైదరాబాద్ లోనే… ఆసిఫ్ నగర్ లో మందుబాబులు పోలీసు వాహనం ఎక్కి వీరంగం వేసి, వాహనం అద్దాలు ధ్వంసం చేశారు. మద్యం మత్తులో హత్యలు, అత్యాచారాలు దాటి పోలీసు వాహనాలపై దాడులు చేసే స్థాయికి పరిస్థితి వచ్చింది. ఈ నగరాన్ని… ఈ పాలనను ఇలాగే వదిలేద్దామా!? పౌర సమాజం ఆలోచన చెయ్యాలి. pic.twitter.com/jIHrYnBtZi
— Revanth Reddy (@revanth_anumula) June 14, 2022
सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेशी संबंधित काही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या गाडीचा छतावर गोंधळ घालतानाचा व्हिडिओ ट्विटर युजरने @revanth_anumula शेअर केला आहे. या व्हिडिओला शेकडो लाईक्स आणि हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. एकीकडे या घटनेवर युझर्स हसत असताना टीका करणारेही अनेकजण आहेत.