Video: मांजरीच्या पाठीवरुन माकडाची राईड, नेटकरी म्हणाले, ये तो ‘फ्री की सवारी’!,

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, मांजरीच्या पाठीवर एक लहान माकड आरामात बसले आहे आणि मांजर देखील त्याला त्याच्या पाठीवर बसवण्यात मजा करत आहे

Video: मांजरीच्या पाठीवरुन माकडाची राईड, नेटकरी म्हणाले, ये तो 'फ्री की सवारी'!,
मांजरीच्या पाठीवर माकडाची सवारी
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 11:51 AM

सोशल मीडियावर आपल्याला माकडांचे अगणित व्हिडिओ पाहायला मिळतात, जे पाहिल्यानंतर आपण आपल्या चेहऱ्यावरचे हसू येतं. माकड हे माणसांचं उत्तम अनुकरण करण्यासाठी ओळखले जातं आणि याची उदाहरणे आपण अनेकदा पाहिली आहेत, परंतु तुम्ही माकडाला मांजरीवर स्वार होताना पाहिले आहे का?, नाही तर आजकाल माकडाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मांजरीच्या सवारीचा आनंद घेत आहे. (Viral Video of Baby Monkey take ride on cat people will Love laugh)

आपल्या सर्वांना माहित आहे की, जीवनात एक चांगला मित्र मिळणे, ही एक मोठी गोष्ट आहे. कारण एक मित्र केवळ आपले जीवन चांगले बनवत नाही, तर आपल्याला वेळोवेळी मदत करतो आणि आपल्याला असण्याची भावना देखील देतो. मैत्रीचा हा नियम प्राण्यांना लागू होतो.अलिकडच्या काळात मांजर आणि माकडाच्या मैत्रीचा एक मजेदार व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मांजर माकडाच्या मुलाला पाठीवर घेऊन फिरताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, मांजरीच्या पाठीवर एक लहान माकड आरामात बसले आहे आणि मांजर देखील त्याला त्याच्या पाठीवर बसवण्यात मजा करत आहे, पण जेव्हा मांजर वेग वाढवते, तेव्हा माकडाने उडी मारली.

हा व्हिडिओ पाहा

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ काही तासांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्याने कॅप्शन लिहिले, ‘मांजर लहान माकडाला घेऊन जात आहे.’ मांजर आणि माकडाच्या मैत्रीने सर्वांची मनं जिंकली आहेत. सर्वजण या व्हिडिओचे खूप कौतुक करत आहेत. एका युजरने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, ‘दोघांच्या मैत्रीचे हे दृश्यं खरोखरच छान आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘लिफ्ट घेण्याचा हा जुगाड खरोखरच मजेशीर आहे.याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

हेही पाहा:

Video: नोरा फतेहीच्या गाण्यावर आफ्रिकन भावंडांचं भन्नाट लिपसिंक, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, हे तर बॉलीवूड स्टारच वाटतात!

Video: सरकारी फाईल तोंडात घेऊन बकरी पसार, सरकारी बाबूवर बकरीमागे धावण्याची वेळ, पाहा भन्नाट व्हिडीओ!

 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.