का? का ?? लोकं पाणीपुरीची अशी वाट लावतात ? याने पाणीपुरीत जे मिसळलंय ते पाहून तुम्हीही म्हणाल… हे भगवान !
Pani Puri : हा व्हिडीओ तुम्ही तुमच्या रिस्कवरच बघा. कारण पाणीपुरी विकणाऱ्या या भय्याने जी अतरंगी गडबड केली आहे, ती कोणीच खरा पाणीपुरी प्रेमी सहन करू शकणार नाही. कारण पाणीपुरी is ultimate LOVE.....

गोलगप्पा, पाणीपुरी, पुचका म्हणा किंवा अजून काही… हा एक असा लोकप्रिय पदार्थ आहे, ज्याचं नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. लहान मूलं असो किंवा वृद्ध वक्ती पाणीपुरीने (Pani Puri) सर्वांनाच वेड लावलंय… चाटची (chat items) गाडी दिसली ती पावलं आपोआपच तिकडे वळतात. गरमागरमा रगडा किंवा बटाट, आंबट गोड चिंचेची चटणी, तिखट पाणी आणि अगदीच हवी असेल तर बुंदी… असा सर्व मसाला काठोकाठ भरलेली पाणीपुरी जेव्हा आपल्या तोंडात जाते, तेव्हा अक्षरश: ब्रह्मानंदी टाळी लागते.
विविध टेस्टचे पाणी असलेली पापू (पाणीपुरीचा शॉर्टफॉर्म हो ! ) तुम्ही आत्तापर्यंत खाल्ली असेलच पण सध्या एक दुकानदार त्यात अशी गोष्ट मिसळून लोकांना खायला घालत आहे, ते पाहून तुम्ही डोक्याला हातच लावाल ! सध्या तूफान व्हायरल गहोत असलेल्या या क्लिपमध्ये तो दुकानदार चक्क ‘केळं’ घातलेली पाणीपुरी विकताना दिसत आहे. ऐकूनच हादरलात ना ! मग आता पुढेही वाचाच…
या व्हिडीओत ही पाणीपुरी कशी बनते तेही दाखवलं आहे. मात्र, हा व्हिडीओ तुम्ही तुमच्या रिस्कवरच बघा. कारण पाणीपुरी विकणाऱ्या या भय्याने जी अतरंगी गडबड खरतंर असा अन्याय केला आहे, तो कोणीच खरा पाणीपुरी प्रेमी सहन करू शकणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसंतय की पाणीपुरी विकणारा हा माणूस, उकडलेले बटाटे किंवा मटारऐवजी पिकलेले केळे वापरत आहे.
एका भांड्यात त्याने केळी सोलून चांगली मॅश केली, मग त्यात हरभरा, मसाले आणि हिरवी कोथिंबीर मिसळून सारण तयार केले. आणि ते सर्व पाणीपुरीच्या पुरीच भरून त्यावर चटकदार पाणी टाकून तो ते लोकांना खायला देत आहे. आता हा अतंरगी प्रकार कुठला, हा प्रश्नही तुम्हाला पडला असेलच. तर तुमची जिज्ञासा शमवण्यासाठी आम्ही सांगू इच्छितो की केळ्याची ही अतरंगी पाणीपुरी तुम्हाला गुजरातमध्ये दिसेल. @MFuturewala या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. खऱ्या पाणीपुरी प्रेमींना मात्र हा व्हिडीओ पाहून चक्कर येणच बाकी आहे.
Hurting the food sentiments of Pani Puri lover’s on the TL
Presenting Banana Chana Pani Puri? pic.twitter.com/961X9wnuLz
— Mohammed Futurewala (@MFuturewala) June 22, 2023
त्यावर विविध लोकांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. अरे देवा ! हा काय दिवस दाखवलास तू मला, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर या गुन्ह्याला कधीच माफी मिळणार नाही, अशी इमोशनल पण मजेशीर कमेंटही दुसऱ्याने केली आहे.
हे पाहून तिसरा युजर तर इतका भडकलाय, की तो म्हणतोय, असं (केळेवाली पाणीपुरी विकण्याचं ) काम करणाऱ्यांना स्वर्गात जागाच मिळणार नाही, अशी कमेंटच केली आहे.