VIDEO : 100 कोटी लोकांना कोरोनाची लस कसं शक्य झालं? ना पंतप्रधान, ना मुख्यमंत्री, हा Video हेच उत्तर

कोरोनाने अख्ख्या जगात हाहाकार माजवला. मात्र, कोरोनावरील लस आल्यापासून त्याचा धोका थोड्याप्रमाणात कमी झाला आहे. भारतातही कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयावह होती. मात्र, आज भारताने एक सुवर्ण इतिहास लिहिलाय, आज भारताने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार केला आहे. आता याबाबतचा लसीकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. तुम्हीच पाहा काय आहे या व्हिडीओत

VIDEO : 100 कोटी लोकांना कोरोनाची लस कसं शक्य झालं? ना पंतप्रधान, ना मुख्यमंत्री, हा Video हेच उत्तर
Corona Vaccine Viral Video
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 12:34 PM

मुंबई : कोरोनाने (Corona Virus) अख्ख्या जगात हाहाकार माजवला. मात्र, कोरोनावरील लस (Corona Vaccine) आल्यापासून त्याचा धोका थोड्याप्रमाणात कमी झाला आहे. भारतातही कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयावह होती. मात्र, आज भारताने एक सुवर्ण इतिहास रचलाय, आज भारताने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा (100 Crore Vaccination) आकडा पार केला आहे. आता याबाबतचा लसीकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. तुम्हीच पाहा काय आहे या व्हिडीओत –

या व्हिडीओमध्ये काही महिला हातात लस ठेवण्याचं सामान घेऊन गल्लीतून जात आहेत आणि चक्क भाजीवाले किंवा हातठेलेवाले ओरडतात तशा या महिला लस घेण्यासाठी लोकांना आवाहन करत आहेत. “कोरोना लसीचा घ्या पहिला डोज, दुसरा डोज”, असं म्हणत या महिला गावभर फिरताना दिसत आहेत. कोरोना लसीकरणाची ही अशी जनजागृती कदाचित आपण पहिल्यांदाच पाहात असाल. हा व्हिडीओ नेमका कुठलाय याबाबतची सध्या काहीही माहिती नाही.

भारतात कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार

देशामध्ये जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज एक नवीन इतिहास भारताने रचला आहे. आज भारताने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार केला आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील RML हॉस्पिटलला भेट देखील देणार आहेत.

भारताने रचला इतिहास

एक नवा इतिहास रचून भारताने जगभरात आज डंका वाजवली आहे. या खास दिवशी लाल किल्ला संकुलात आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया हे ऐतिहासिक लसीकरणावरील गाणे आणि चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. याशिवाय देशातील विविध शहरांमध्ये भाजपचे मोठे नेते कार्यक्रमांचे आयोजन देखील करणार आहेत. भारत सरकारच्या कोविन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 100 कोटी डोस देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

फॉलोअर्सने प्रवृत्त केलं, सोशल मीडिया स्टारचा लाईव्हदरम्यान कीटनाशक प्यायल्याने मृत्यू

Kapil Dev | कपिल देव यांचा रणवीर सिंग लूक व्हायरल, चाहत्यांकडून मजेशीर कमेंट्स

लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.