Video: ‘अपनी गली मैं कुत्ता शेर’, पण दुसऱ्याचं गल्लीत गेल्यावर कुत्र्याची काय हालत होते?, पाहा पोट धरुन हसवणारा व्हिडीओ
व्हिडीओमध्ये एक पाळीव कुत्रा दुरुनच कोंबड्यांवर खूप भुंकताना दिसतो, पण जसं त्याला कोंबड्यांच्या खुराड्यात सोडलं जातं, त्याची हालत खराब होते.
‘हर कुत्ता अपनी गली में शेर होता है’, ही हिंदीतली म्हण तुम्ही ऐकली असेल, ही म्हण त्यांच्यासाठी वापरली जाते, सांगून जे लोक फुशारकी मारतात, पण जेव्हा खरं करण्याची वेळ येते, तेव्हा पळ काढतात. ही म्हण फक्त कुत्र्यांवर असली तरी ती माणसांवरही लागू होते. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ पाहून तुमचा नक्कीच विश्वास बसेल की, ही म्हण कुत्र्यांवर का लावली जाते. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाहीत. (Viral video of Dog was barking on chickens funny video )
व्हिडीओमध्ये एक पाळीव कुत्रा दुरुनच कोंबड्यांवर खूप भुंकताना दिसतो, पण जसं त्याला कोंबड्यांच्या खुराड्यात सोडलं जातं, त्याची हालत खराब होते. त्याला काय करावं सुचत नाही. तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक लोखंडी रेलिंगसारखी भिंत आहे, ज्याच्या पलीकडे कुत्रा आहे आणि दोन कोंबड्या खुराड्यात आहेत. त्या कोंबड्यांना पाहून हा कुत्रा इकडून तिकडे धावतो आणि त्यांच्यावर खूप भुंकतो, पण नंतर एक मुलगी त्याला उचलून पलीकडच्या बाजूला ठेवते, जिथं कोंबड्या राहतात, आता कुत्र्याने कोंबड्यांना आपल्या जवळ पाहिल्यावर त्याची अवस्था वाईट होते
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
हा मजेदार व्हिडिओ asupan.reels.hewani नावाने इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 3 मिलियनपेक्षा जास्त म्हणजेच 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 1 लाख 33 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.
त्याचबरोबर व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका युजरने ‘आता भुंकू नको’ अशी कमेंट केली आहे, तर दुसर्या युजरने लिहिले आहे की, ‘उगाच घाबरवण्याचं नाटक करु नका, नाहीतर ते कधीही अंगाशी येतं.’
हेही पाहा: