Video: टीव्ही पाहणाऱ्या कुत्र्यासोबत मालकाने असा प्रँक केला, की नेटकरी पोटधरुन हसले!

बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की घरातील पाळीव प्राणी लहान मुलांप्रमाणेच वागतात, मग ते अन्न असो किंवा कोणताही खेळ, त्यांची कृती पूर्णपणे लहान मुलांसारखी असते. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे

Video: टीव्ही पाहणाऱ्या कुत्र्यासोबत मालकाने असा प्रँक केला, की नेटकरी पोटधरुन हसले!
एक कुत्रा टीव्हीच्या अगदी जवळ उभा आहे आणि आनंदाने टीव्हीचा आनंद घेत आहे
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 2:51 PM

स्टाईल आणि अनोख्या अंदाजाच्या बाबतीत प्राणी माणसांपेक्षा कणभरही कमी नाहीत, इंटरनेटवर अशाच काही प्राण्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. ज्यात प्राण्यांचा हा अनोखा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आज आपण असाच एक व्हिडीओ पाहणार आहोत, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही खदखदून हसाल ( Viral video of dog watching TV with pleasure suddenly owner on the volume see what happen next)

बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की घरातील पाळीव प्राणी लहान मुलांप्रमाणेच वागतात, मग ते अन्न असो किंवा कोणताही खेळ, त्यांची कृती पूर्णपणे लहान मुलांसारखी असते. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जिथं कुत्रा आनंदाने टीव्ही बघत असतो, पण नंतर अचानक काहीतरी घडते, जे पाहून तो घाबरतो.

टीव्हीच्या जवळ उभं राहणं महागात

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा टीव्हीच्या अगदी जवळ उभा आहे आणि आनंदाने टीव्हीचा आनंद घेत आहे, पण मालकाने टीव्ही सुरु करताच जोरदार आवाज येतो, ज्यात एक कुत्रा भुंकत असतो. हे पाहून घरातला कुत्रा घाबरतो आणि तो मागे धावतो.

पाहा व्हिडीओ:

तुमच्या माहितीसाठी, हा व्हिडिओ ViralPosts नावाच्या एका अकाऊंटने शेअर केला आहे. ज्याला ही बातमी लिहीपर्यंत 5 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर युजर्सकडून हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

खरं म्हणजे कुत्रा ना मागे पळू शकतो, ना असं काही करु शकतो. सध्या जापान, चीन वा इतर देशांमध्ये कुत्र्यांचे असे व्हिडीओ एडिट करुन बनवले जातात. कुत्र्यांना मागं खेचण्यासाठी, त्यांचे हावभाव बदलण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो, जेणेकरुन हे व्हिडीओ खरोखरचेच वाटतात.

एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं की, ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी हसू थांबवू शकत नाही.’ तर दुसऱ्याने लिहिलं, ‘कुत्रा ज्या प्रकारे घाबरला होता, तो प्रसंग खूप मजेदार होता.’ तिसऱ्याने लिहिले की, ‘त्याचा मालक त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागला. याशिवाय अनेकांनी इमोजी वापरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही पाहा:

VIDEO | अस्वलाला कॅमेरा सापडला आणि त्याने त्याच्यासोबत जे केलं ते पाहून नेटकरी आवाक

Video: प्लास्टिकच्या बाटलीत कुत्र्याचं तोंड फसलं, सायकलस्वारांनी कुत्र्याचा जीव वाचवला, व्हिडीओ व्हायरल

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....