VIDEO: तोल गेला अन् गाढव टेकडीवरून घसरलं, दगडांवरुन ठेचकाळत खाली आलं, पण क्षणात उभं राहून चालायला लागलं

Viral Video | एरवी गाढव म्हणजे थट्टेचा किंवा अपमानाचा विषय असतो. मात्र, हा प्राणी किती काटक आणि सामर्थ्यशाली असू शकतो, याचा प्रत्यय या व्हीडिओतून येईल.

VIDEO: तोल गेला अन् गाढव टेकडीवरून घसरलं, दगडांवरुन ठेचकाळत खाली आलं, पण क्षणात उभं राहून चालायला लागलं
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 12:38 PM

मुंबई: सोशल मीडियावरील अनेक व्हीडिओ हे तुम्हाला अनेकदा आश्चर्यात टाकणारे ठरतात. या व्हीडिओंमध्ये काहीतरी भयंकर घडणार असे वाटत असतानाच चमत्कारासारखे काहीतरी घडते आणि सर्व गोष्टी सुरळीत आणि सुखरुप राहतात. सध्या सोशल मीडियावर एका गाढवाचा असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

एरवी गाढव म्हणजे थट्टेचा किंवा अपमानाचा विषय असतो. मात्र, हा प्राणी किती काटक असतो, याचा प्रत्यय या व्हीडिओतून येईल. या व्हीडिओत अंगावर ओझे लादलेले एक गाढव टेकटीवर उभे असलेले दिसत आहे. या गाढवाच्या आजुबाजूला मेंढ्या फिरताना दिसत आहेत. त्यावेळी अचानक या गाढवाचा तोल जाऊन ते टेकडीवरून खाली घसरताना दिसते.

या टेकडीचा बहुतांश भाग हा खडकाळ दिसत आहे. त्यामुळे गाढवाचा तोल गेल्यावर ते दगड आणि खडकांवर ठेचकाळत खाली गडगडत येताना दिसते. हे पाहिल्यावर या दुर्घटनेत गाढव जबर जखमी होईल किंवा त्याचा जीव गेला असेल, असे आपल्याला वाटते. मात्र, टेकडीच्या पायथ्याशी घरंगळत आल्यानंतर गाढव काही झालेच नाही, अशाप्रकारे उठून पुन्हा चालायला लागते. साहजिकच हा प्रकार अचंब्यात टाकणारा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हीडिओ अनेकांची पसंती मिळत आहे.

संबंधित बातम्या:

Video : वधू-वराकडून स्टेजवर पुश-अप; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या धमाकेदार प्रतिक्रिया, हा व्हिडीओ पाहाच

Video : दोन वृद्ध एकमेकांना भिडले, त्यांचा जोश पाहून तुम्हीही थक्क व्हाल; पुढे काय झालं तुम्हीच पाहा!

Video | बर्थडे सेलिब्रेशनसाठी तरुणी रुसली, समजूत काढताना बॉयफ्रेंडने हात टेकले, व्हिडीओ पाहाच !

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.