Elephant Video: कुणाचं काय तर हत्तीचं काय! भिंत तोडली, अन्नपदार्थ चोरले, लबाड!
तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सीसीटीव्ही (CCTV Video) मध्ये कैद झाल्यामुळे हा व्हिडीओ समोर आलाय.
तामिळनाडू: प्राण्यांचे व्हिडीओ कायम व्हायरल (Animal Viral Video) होत असतात. हत्तीचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत. कायम हत्तीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण कधी हत्तीने चोरी केलेली पहिलीये का? ते पण भिंत तोडून? एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात हत्ती एका घराची भिंत तोडून आपल्या सोंडेने आतलं अन्न चोरतोय. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. तामिळनाडू मधील हा व्हायरल व्हिडीओ आहे. तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सीसीटीव्ही (CCTV Video) मध्ये कैद झाल्यामुळे हा व्हिडीओ समोर आलाय. हा हत्ती (Elephant) कुठून आला कसा आला याबद्दल कुणालाही माहिती नाही. या हत्तीच्या मार्किंग वरून आता वनविभाग याचा शोध लावणार आहे.
व्हिडीओ
व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसतंय की हत्ती भिंत तोडून आपल्या सोंडेने अन्नपदार्थ चोरतोय. भूक लागल्यावर माणूस अन्नपदार्थ चोरू शकतो हे माहित आहे पण प्राणी असं काही करू शकतो हा पहिल्यांदाच समोर आलंय. या दरम्यान कोणतीही मनुष्य हानी झालेली नाही.तरीही हा हत्ती नेमका आला कुठून याचा शोध सुरु आहे.
दरम्यान असाच एक प्राणी व्हायरल होतोय जो जगातला सगळ्यात कुरूप कुत्रा आहे. अमेरिकेतील ॲरिझोना येथील 17 वर्षीय चिहुआहुआ मिक्स हा जगातील सर्वात कुरूप कुत्रा म्हणून ओळखला जात आहे. “सोनोमा-मरिन” हा कार्यक्रम जवळपास 50 वर्षांपासून आयोजित केला जातो. ही एक कॅलिफोर्नियातील जत्रा आहे. कोरोनामुळे या जत्रेचं आयोजन करता येत नव्हतं पण यंदा तब्बल दोन वर्षानंतर या “सोनोमा-मरिन” चं आयोजन करण्यात आलं आणि त्यात ही स्पर्धा घेण्यात आली. मिस्टर हॅप्पी फेस या स्पर्धेचा विजेता ठरला. 17 वर्षीय कुत्र्याला ट्यूमर आणि न्यूरोलॉजिकल समस्या आहेत. त्यामुळे त्याचा चेहरा थोडासा विद्रुप आहे. बऱ्याच इतर कुत्र्यांना हरवून चिहुआहुआ मिक्सने जगातल्या सर्वात कुरूप कुत्र्याचा किताब पटकावलाय.