Video: स्प्लेंडरला बनवलं ट्रॅक्टर, नांगरलं सगळं शेत, पाहा शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड
एका शेतकऱ्याने दुचाकीद्वारे आपले शेत नांगरलेले दिसते, यासाठी त्याने बैल किंवा कोणतंही ट्रॅक्टर वापरलं नाही, दुचाकीची मदत घेतली
जुगाड, एक असा शब्द, ज्याद्वारे आपण आपले कोणतेही काम अगदी सहजपणे करू शकतो. या युक्त्यांद्वारे आपण आपले काम कमी वेळेत आणि कमी गोष्टींमध्ये करू शकतो. सोशल मीडियावर अशा अनेक जुगाडांचे व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. सध्या असाच एक जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही समजेल की, आपल्या देशातील जुगाड तंत्रज्ञान किती प्रगत आहे. ( viral-video-of-farmer-who-plow-his-field-with-bike-people-were-shocked-after-see-this-jugaad-maharashtra farmer jugaad )
व्हिडिओमध्ये, एका शेतकऱ्याने दुचाकीद्वारे आपले शेत नांगरलेले दिसते, यासाठी त्याने बैल किंवा कोणतंही ट्रॅक्टर वापरलं नाही, दुचाकीची मदत घेतली आणि त्याचं संपूर्ण शेत नांगरलं. हा व्हिडीओ पाहिल्यावर मोठमोठे इंजिनिअर्स स्तब्ध झाले असतील
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शेतकऱ्याने नांगरणी करण्यासाठी बाईकची मदत घेतली. यासाठी त्याने त्याच्या बाईकच्या मागच्या चाकावर लोखंडाचा एक छोटासा नांगर बांधला, त्यानंतर बाईक शेतात नेली, आणि नांगरणी सुरु केली.
व्हिडीओ पाहा:
View this post on Instagram
शेतकऱ्याचा हा जुगाडी व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले, ‘व्वा! देसी जुगाड जिंदाबाद ..! त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले, ‘याला जुगाडू शेती म्हणतात.’ अजून एकाने कमेंट केली, ‘ही कल्पना खरंच मस्त आहे.’ याशिवाय, इतर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.
हा मजेदार व्हिडिओ jugaadu_life_hacks नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला बातमी लिहीपर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. तर, या जुगाड बद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.
हेही पाहा:
मुंबई पोलिसांची बातच न्यारी ! बँड पथकानं सादर केलं ‘ऐ वतन तेरे लिए’ गाणं, व्हिडीओ व्हायरल
Video: विवाहाचा सर्वोत्तम प्रस्ताव, उद्योगपती हर्ष गोयंकांनाही व्हिडीओ आवडला, विवाह प्रस्तावावर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स