Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : वृद्ध महिलेकडून स्ट्रॉबेरी विकत घेणाऱ्याचं सोशल मीडियावर होतंय कौतुक, काय केलं असं? पाहा व्हिडिओ

एक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होतोय. एका वृद्धेला मदत करतानाचा हा व्हिडिओ आहे. एका पुरुषाला रस्त्यावर स्ट्रॉबेरी(Strawberries)नं भरलेले बॉक्स विकणारी महिला दिसली, तेव्हा त्यानं ते सर्व तिच्याकडून विकत घेण्याचं ठरवलं.

Viral Video : वृद्ध महिलेकडून स्ट्रॉबेरी विकत घेणाऱ्याचं सोशल मीडियावर होतंय कौतुक, काय केलं असं? पाहा व्हिडिओ
स्ट्रॉबेरी विकणारी वृद्धा (सौजन्य @Pubity Insta)
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 4:26 PM

आपण बाहेर असताना एखाद्यानं दुसऱ्यावर दयाभाव दाखवल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. एखाद्याला मदत केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव दिलासा देणारे असतात. असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होतोय. एका वृद्धेला मदत करतानाचा हा व्हिडिओ आहे. एका पुरुषाला रस्त्यावर स्ट्रॉबेरी(Strawberries)नं भरलेले बॉक्स विकणारी महिला दिसली, तेव्हा त्यानं ते सर्व तिच्याकडून विकत घेण्याचं ठरवलं. पण पुढे त्यानं जे केलं त्यामुळे महिलेचे डोळे पाणावले.

‘सर्व स्ट्रॉबेरी विकत घेणार’ इंस्टाग्राम यूझर @Pubityनं अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस स्ट्रॉबेरी विकत असलेल्या वृद्ध महिलेकडे येताना तुम्ही पाहू शकता. व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या भाषांतरानुसार, तो माणूस आधी म्हणाला, “हॅलो कशा आहात? स्ट्रॉबेरी किती आहेत?” ती महिला प्रति बॉक्स तीन डॉलर्स आहे, असं सांगते. मग, तो माणूस म्हणतो की तो सर्व स्ट्रॉबेरी विकत घेईल. ती बाई त्याला खोके देणार तितक्यात, तो तिला असं म्हणत आश्चर्यचकित करतो, “तुला काय माहीत आहे? स्ट्रॉबेरी तुमच्याजवळच ठेवा जेणेकरून आणखी पैसे कमवू शकाल.”

अनेकांकडून कौतुक व्हिडिओ अपलोड केल्यापासून, त्याला 34.4 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. 2.5 दशलक्ष लाइक्स आणि हजारो कमेंट्स कौतुक आणि प्रेमानं भरलेल्या आहेत! एका व्यक्तीनं लिहिलं, “चला या पृथ्वीवर आशीर्वादाचा वर्षाव सुरू ठेवू या. #humanitywins” आणखी एक व्यक्ती म्हणाली, “मला माझ्या फीडवर या प्रकारचा व्हिडिओ पहायचा आहे. सध्या जग खूप वाईट गोष्टींनी भरलं आहे, मी अशा एखाद्या चांगल्या कृतीसाठी आनंदी आहे. स्वत: चांगली कृत्ये करून आणि मानवतेवरचा विश्वास दृढ करत असल्याचं यातून दिसतं. मला एखाद्याचा चेहरा उजळलेला पाहायचा आहे. जेव्हा त्यांना चांगल्या लोकांमध्ये प्रेमळभाव जाणवतो.” अनेकांनी या कृतीचं कौतुक केलंय. तर काहींनी ते रेकॉर्ड करण्यास विरोध केला.

Viral Video : थंडीपासून वाचण्यासाठी बाइकस्वाराचं देसी जुगाड! यूझर्स म्हणतायत, टॅलेंट भारताबाहेर जायला नको…

कतरिना, करीना हिच्यापुढं सगळ्या फिक्या, अस्सल अहिराणी गाण्यावरचा 20 सेकंदाचा हा Video पुन्हा पुन्हा पहाल

नोरा फतेही आणि गुरू रंधावाच्या गाण्यावर थिरकली शाळकरी मुलगी, 19 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय Naach Meri Raniचा हा Video

पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला....
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट....
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.