याला म्हणतात Desi Jugaad! चालत्या ट्रकमध्ये खेळतोय झोका, Video Viral
हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय. 3 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय, खूप लोकांनी यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्यात. एकजण खाली कमेंट करताना लिहितोय, "जर ड्रायव्हरने ब्रेक लावला तर काय होईल?" एकाने लिहिलं, " जीवनाची हीच मजा आहे" तर दुसऱ्याने लिहिलं, "जास्त जोरात झोके घेऊ नका नाहीतर तुम्ही बाहेर पडाल."
मुंबई: आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण एक व्हायरल व्हिडीओ पाहिला होता ज्यात एका तरुणाने फक्त ४५००० रुपयात मारुती गाडीला रोल्स रॉयस मध्ये मॉडिफाय केलं होतं. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. या तरुणाचं खूप कौतुक करण्यात आलं. व्हिडीओ बघितल्यावर प्रश्न पडतो हे कसं जमलं असावं? पण असे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत नाही का? जुगाड करणं भारतीयांना चांगलं जमतं. कमीतकमी पैशात किंवा कधी कधी तर शून्य पैशात काहीतरी वाढीव तयार करणं हे आपल्याकडे लोकं सर्रास करू शकतात. जुगाड तंत्राने तर मोठमोठे उद्योगपती सुद्धा प्रभावित होतात आणि असे व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करतात. असे जुगाड बाहेर कुठे नाही पण भारतात नक्कीच दिसून येतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. काय आहे या व्हिडीओ मध्ये…बघुयात.
ट्रकमध्ये झोका बांधलाय
या व्हिडीओ मध्ये एका ट्रकमध्ये एका व्यक्तीने झोका बांधलाय. हा व्हिडीओ बघून तुम्ही खूप हसाल. आता ट्रक तर तुम्हाला काही नवीन नाहीत. पण हा व्हिडीओ जरा हटके आहे. ट्रक मध्ये या माणसाने झोका बांधलाय आणि आनंदाने हा माणूस झुला झुलतोय. या ट्रकमध्ये वर रॉड आहेत. या लोखंडी रॉडला या व्यक्तीने दोरखंड बांधलाय आणि त्याचा झुला बनवलाय. एवढी शक्कल त्याने नेमकं कोणत्या कारणासाठी लावलीये ते काय कळलेलं नाही.
View this post on Instagram
व्हिडीओ खूप मजेदार
विशेष म्हणजे चालत्या ट्रकमध्ये हा माणूस झोक्यावर बसून झोका खेळतोय. लहान मुलं ज्याप्रकारे घरात झोका खेळतात, त्यांना जसा झोका खेळायला आवडतो तसंच या माणसाकडे बघून वाटतं. या ट्रकच्या मागे ज्या गाड्या आहेत त्यातल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केलाय. हा व्हिडीओ खूप मजेदार आहे. चालत्या ट्रकमध्ये सुद्धा हा माणूस जोरजोरात झोके घेतोय. badboy_6278m नावाच्या अकाऊंटने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केलाय.