बसच्या धडकेतून बचावला स्कूटरचालक! काळजाचा थरकाप उडवणारा हा Viral Video पाहा

व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की भरधाव वेगानं स्कूटी चालवणारा तरुण बसला धडकल्यानंतर थोडक्यात बचावला.

बसच्या धडकेतून बचावला स्कूटरचालक! काळजाचा थरकाप उडवणारा हा Viral Video पाहा
मंगळुरू अपघात
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 5:42 PM

देशात दररोज हजारो रस्ते अपघात (Accident) होतात. यातील काही लोक अपघातांना बळी पडतात, तर काही लोकांचं नशीब चांगलं असतं आणि ते वाचतात. बहुतेक अपघातांमध्ये लोक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. यापूर्वी असंच काहीसं कर्नाटकातल्या मंगळुरू इथं पाहायला मिळालं. हा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की भरधाव वेगानं स्कूटी चालवणारा तरुण बसला धडकल्यानंतर थोडक्यात बचावला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही क्षणभर घाबरू शकतो.

स्कूटरस्वार बचावला

मंगळुरूमधल्या एलियार पडवू रोडवर ही घटना घडली. हे लक्षात घ्यावं लागेल, की हा रस्ता फारसा वर्दळीचा नाही. गेल्या मंगळवारी संध्याकाळी एक खासगी बस मंगळुरूहून एलियार पडवूला जात होती. त्यावेळी रस्त्यावर फारशी वाहनं नव्हती. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर बस चालकानं अचानक यू-टर्न घेतला. यादरम्यान पलीकडून भरधाव वेगानं येणारा स्कूटर चालकाला दिसला नाही. बसच्या धडकेतून स्कूटर कसा बचावण्यात यशस्वी होतो, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मात्र, प्रत्येकाचं नशीब इतकं चांगलं नसतं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. आता हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

व्यस्त रस्ता नाही, तरीही…

हा व्हिडीओ केवळ 15 सेकंदांचा आहे, मात्र तो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरनं लिहिलंय, की, मंगळुरूचा एलियार पडवू रोड इतका व्यस्त रस्ता नाही. पण तरीही हे दृश्य आश्चर्यकारक आहे.

स्कूटरस्वाराचं नियंत्रण सुटलं

ट्विटरवर Mangalore Cityनावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यूझरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की मंगळुरूमधला एक स्कूटरस्वार बसनं धडक दिल्यानंतर चमत्कारिकरित्या बचावला. मात्र, यादरम्यान स्कूटरस्वाराचं नियंत्रण सुटलं आणि त्याची स्कूटर तिथं असलेल्या फिश प्रोसेसिंग युनिटच्या दरवाजाला धडकली. सुदैवाने स्कूटरस्वाराला फारशी दुखापत झाली नाही.

ऑटोवाल्या भैयाचा हा देशी जुगाड पाहिला का? Viral Video पाहून यूझर्स म्हणतायत, वाह! क्या सीन है!

कुत्री आणि मांजरांचा हा Viral Video पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘ये लाजवाब है!’

Viral Video in Gym : जिममध्ये करत होता चुकीच्या पद्धतीनं व्यायाम, नंतर घडतं असं काही…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.