VIDEO: समुद्रकिनाऱ्यावर महाकाय कासव उलटं पडलं, लोक धावले मदतीला

Viral Video | कासवं अनेकदा उल्टी पडल्यानंतर त्यांना पुन्हा सरळ होण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागताल. त्यासाठी कासवांना तासनतास धडपड करावी लागते. यामध्ये बरीच उर्जा खर्च होत असल्याने अनेकदा कासवांचा मृत्यूही होतो.

VIDEO: समुद्रकिनाऱ्यावर महाकाय कासव उलटं पडलं, लोक धावले मदतीला
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 8:16 AM

मुंबई: सोशल मीडियावर सर्वाधिक व्ह्यूज किंवा लाईक्स मिळणाऱ्या व्हीडिओजमध्ये प्राण्यांच्या व्हीडिओचा समावेश असतो. यापैकी प्राण्यांची सुटका करण्याचे प्रसंग पाहून अनेकजण भावनिकही होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर उलट्या पडलेल्या महाकाय कासवाची सुटका करतानाचा प्रसंग आहे.

कासवं अनेकदा उल्टी पडल्यानंतर त्यांना पुन्हा सरळ होण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागताल. त्यासाठी कासवांना तासनतास धडपड करावी लागते. यामध्ये बरीच उर्जा खर्च होत असल्याने अनेकदा कासवांचा मृत्यूही होतो. मात्र, या व्हीडिओतील कासव याबाबत सुदैवी ठरले आहे. वेळीच लोक मदतीला धावून आल्यामुळे या कासवाची सुटका झाली.

या व्हीडिओत कासव समुद्राच्या अगदी जवळ उलटे पडलेले दिसत आहे. बराचवेळ उलटे पडल्याने त्याचे डोकेही समुद्राच्या वाळूत रुतलेले दिसत आहे. प्रचंड वजनामुळे या कासवाला पुन्हा सरळ होणे जवळपास अशक्यप्राय दिसत आहे. अशावेळी समुद्रकिनाऱ्यावरील दोन व्यक्तींनी त्याठिकाणी धाव घेत कासवाला सरळ केले. अर्थात या कासवाचे वजन खूपच जास्त असल्याने या दोघांनाही त्याला पुन्हा सुलटं करण्यासाठी बराच जोर लावावा लागला. त्यानंतरही कासवाच्या अंगात फार ताकद उरली नव्हती. तेव्हा याच दोघांनी कासवाला समुद्रापर्यंत ढकलत नेले.

सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. Life and nature या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे.

तोल गेला अन् गाढव टेकडीवरून घसरलं, दगडांवरुन ठेचकाळत खाली आलं, पण…

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका गाढवाचा असाच एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. एरवी गाढव म्हणजे थट्टेचा किंवा अपमानाचा विषय असतो. मात्र, हा प्राणी किती काटक असतो, याचा प्रत्यय या व्हीडिओतून येईल. या व्हीडिओत अंगावर ओझे लादलेले एक गाढव टेकटीवर उभे असलेले दिसत आहे. या गाढवाच्या आजुबाजूला मेंढ्या फिरताना दिसत आहेत. त्यावेळी अचानक या गाढवाचा तोल जाऊन ते टेकडीवरून खाली घसरताना दिसते.

या टेकडीचा बहुतांश भाग हा खडकाळ दिसत आहे. त्यामुळे गाढवाचा तोल गेल्यावर ते दगड आणि खडकांवर ठेचकाळत खाली गडगडत येताना दिसते. हे पाहिल्यावर या दुर्घटनेत गाढव जबर जखमी होईल किंवा त्याचा जीव गेला असेल, असे आपल्याला वाटते. मात्र, टेकडीच्या पायथ्याशी घरंगळत आल्यानंतर गाढव काही झालेच नाही, अशाप्रकारे उठून पुन्हा चालायला लागते. साहजिकच हा प्रकार अचंब्यात टाकणारा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हीडिओ अनेकांची पसंती मिळत आहे.

संबंधित बातम्या:

Video : वधू-वराकडून स्टेजवर पुश-अप; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या धमाकेदार प्रतिक्रिया, हा व्हिडीओ पाहाच

Video : दोन वृद्ध एकमेकांना भिडले, त्यांचा जोश पाहून तुम्हीही थक्क व्हाल; पुढे काय झालं तुम्हीच पाहा!

Video | बर्थडे सेलिब्रेशनसाठी तरुणी रुसली, समजूत काढताना बॉयफ्रेंडने हात टेकले, व्हिडीओ पाहाच !

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.