चालत्या ट्रेनमधून उडी मारण्याचा प्रयत्न जीवाशी, रेल्वे पोलिसांच्या धाडसामुळे प्राण वाचले, पाहा धक्कादायक व्हिडीओ!

ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात एका महिलेने चालत्या ट्रेनमधून उडी मारते आणि धडपडते. काही क्षणांनंतर आणखी एका महिलेने ट्रेनमधून उडी मारली आणि तीही तिच्या अंगावर पडली.

चालत्या ट्रेनमधून उडी मारण्याचा प्रयत्न जीवाशी, रेल्वे पोलिसांच्या धाडसामुळे प्राण वाचले, पाहा धक्कादायक व्हिडीओ!
चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न अंगाशी
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 6:12 PM

अनेकदा तुम्ही चालत्या ट्रेनमध्ये अपघात झाल्याच्या घटना पाहिल्या असतील. ज्या पाहिल्यानंतर अंगावर शहारे उभे राहतात. त्यामुळेच रेल्वे स्थानकावर लोकांना सतर्क राहण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, असे सांगूनही अनेकदा लोक असे कृत्य करतात, ज्यामुळे त्यांच्या जीवावर बेतते. तुम्ही सर्वांनी अशा घटनांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये प्लॅटफॉर्मवर अनेकदा प्रवासी अपघाताला बळी पडतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला रेल्वे स्टेशनवर अपघात होण्यापासून बचावली आहे. (Viral Video of Rpf officer saves woman who fell down moving train Accident video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही प्रवासी चालत्या ट्रेनमधून उतरताना दिसत आहेत. त्याच वेळी, ट्रेन हळू हळू वेग पकडू लागते. ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात एका महिलेने चालत्या ट्रेनमधून उडी मारते आणि धडपडते. काही क्षणांनंतर आणखी एका महिलेने ट्रेनमधून उडी मारली आणि तीही तिच्या अंगावर पडली. मात्र, सुदैवाने काही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच त्यांना वाचवण्यासाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचा (RPF) जवान धावला. आता सोशल मीडियावर या जवानाचं भरपूर कौतुक होत आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहा

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या हँडलवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. आता आरपीएफ जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे. इतकं समजावूनही लोक असा मूर्खपणा करतात आणि जीव धोक्यात घालतात. बर्‍याचदा तुम्ही पाहिले असेल की, लोक चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे असे धोकादायक अपघात होतात, ज्यामध्ये अनेक वेळा लोकांना आपला जीवही गमवावा लागतो.

हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. यासोबतच सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहिले, महिलेला वाचवल्याबद्दल एसआय बबलू कुमार धन्यवाद. तुम्ही फक्त एकाचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचा जीव वाचवला आहे. देव तुमचं कल्याण करो. आणखी एका यूजरने लिहिले – RPFमुळे रेल्वे सुरक्षित आहे. या विभागातील प्रत्येक अधिकारी असाच असावा. दुसर्‍याने लिहिले, सर, तुम्हीच खरे हिरो आहात.

हेही पाहा:

Viral: कर भला, तो हो भला, आजीबाईच्या मदतीला गेले आणि जीव वाचला, पाहा जोडप्याचा हादरवणारा व्हिडीओ!

Video: लोक जग मुठीत बंद करण्याचा प्रयत्न करतात, हा चिमुरडा पाणी खिशात बंद करतोय, पाहा चिमुरड्याचा गोंडस व्हिडीओ!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.