शिक्षकाने विचारलं 5 पैकी 5 गेले तर किती शिल्लक राहतात? पठ्ठयाचं उत्तर ऐका
बरेचदा ही उत्तरं प्रचंड व्हायरल होतात. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका मुलाने शिक्षकांच्या प्रश्नाचे उत्तर दिले की जर 5 पैकी 5 गेले तर किती शिल्लक राहील. या प्रश्नाला उत्तर देताना त्या मुलाने उत्तर दिले.
मुंबई: शाळेतील लहान मुलांचे व्हिडिओ अनेकदा समोर येत असतात. यामध्ये मुलांचा आत्मविश्वास दिसून येतो. शिक्षकांच्या प्रश्नोत्तरादरम्यान त्यांचे उत्तर ऐकण्यासारखे असते. बरेचदा ही उत्तरं प्रचंड व्हायरल होतात. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका मुलाने शिक्षकांच्या प्रश्नाचे उत्तर दिले की जर 5 पैकी 5 गेले तर किती शिल्लक राहील. या प्रश्नाला उत्तर देताना त्या मुलाने उत्तर दिले.
खरंतर हा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे. यात एक मूल शिक्षकाकडे बघताना दिसत आहे. शिक्षक आधी त्याला विचारतात की 5 पैकी 5 गेले तर किती शिल्लक राहील. त्यानंतर मूल उत्तर माहित नसल्याचं सांगतं. मग शिक्षक हा प्रश्न सुधारतो आणि विचारतो की तुमच्याकडे पाच भटूरे असतील ते पाच जर आम्ही घेतले असतील तर तुमच्याकडे काय शिल्लक राहील.
यांनतर तो मुलगा चपखलपणे सांगतो भटुरे घेतल्यावर माझ्याकडे छोले शिल्लक राहतात. एवढं बोलून तो स्वत: हसू लागतो आणि त्याचं उत्तर ऐकून वर्गात उपस्थित मुलं हसू लागतात, तसेच टाळ्याही वाजवू लागतात. मुलाची स्टाईल आणि गोंडसपणा पाहून तो रागावत नाही, तर हसतो.
बहुत ही रोचक उत्तर मिला…?? pic.twitter.com/cI7dS4UFXq
— Hasna Zaroori Hai ?? (@HasnaZarooriHai) July 7, 2023
सध्या हा व्हिडिओ केव्हा आणि कुठून आलाय याची पुष्टी झालेली नसली तरी तो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. काही लोकांचा असा विश्वास आहे की हा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे आणि मुद्दाम बनवला गेला आहे. तर काही लोक असंही म्हणत आहेत की काहीही झालं तरी हा अतिशय क्यूट व्हिडिओ आहे.