Video: चिमुरड्यांना पाठीवर उचलून रस्त्याच्या कडेला पोहचवलं, नेटकरी म्हणाले, भाऊ असावा तर असा!
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावर खूप पाणी आहे. त्यामुळे तिथं उभ्या असलेल्या 2 लहान मुलं आणि 1 लहान मुलगी तिथून बाहेर पडू शकत नाही.
मोठ्या भावाचं असणं हे किती गरजेचं आहे, हे तुम्हाला अनेक घटनामधून लक्षात येतं. सोशल मीडियावर असेच भावंडांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये भावा बहिणीच्या नात्यातील ओलावा पाहायला मिळतो. असे व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. लोकांना हे व्हिडिओ इतके आवडतात की, ते ते पुन्हा पुन्हा पाहिले जातात. सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक भाऊ त्याच्या लहान भावंडांना मदत करताना दिसत आहे. (Viral Video of The elder brother was seen helping his younger brother and sister )
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावर खूप पाणी आहे. त्यामुळे तिथं उभ्या असलेल्या 2 लहान मुलं आणि 1 लहान मुलगी तिथून बाहेर पडू शकत नाही. काही क्षणांनंतर एक मुलगा त्याच्या पाठीवर उचलून घेतो आणि त्या लहान मुलीला दुसऱ्या रस्त्याच्या बाजूला घेऊन जातो. मग परत त्या ठिकाणी येतो, आणि दुसऱ्या मुलालाही उचलून नेतो.
व्हायरल व्हिडीओ:
This is why we all need a brother ? pic.twitter.com/3ru2sG9nvx
— Susanta Nanda (@susantananda3) December 13, 2021
व्हिडीओमध्ये पुढे बघायला मिळतं की, ही दोन्ही भावंडं आरामात दुसऱ्या बाजूला पोहोचतात. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. सुसंता नंदा यांच्या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना खूप आकर्षित करत आहे, सोबतच लोक या व्हिडिओवर आपल्या लाईक्स आणि कमेंट्सने भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले – म्हणूनच आम्हा सर्वांना भाऊ हवे आहेत.
व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट करत लिहिले, हे भाऊ आणि बहिणीचे सुंदर नातं आहे. दुसर्या युजरने लिहिले, माझ्या मोठ्या भावाने मला असे कधीच उचलून नेले नाही, उलट मीच त्याला उचललं आहे, मी त्याच्यापेक्षा जास्त ताकदवान आहे.
हेही पाहा: