Video: स्कुटीची थोडीही मोडतोड न करता, डिकीतील सामान गायब, पाहा चोरांची हातचलाखी!
एका चोरट्याने स्कूटीचं कुशन वर खेचलं आणि दुसऱ्या चोरट्याने जागा होताच मध्येच हात टाकला आणि आत ठेवलेली पर्स बाहेर काढली.
सोशल मीडियाचे जग खूप विचित्र आहे. तो कधी व्हायरल होईल हे येथे काही सांगता येत नाही. तसे, जगात चोरीच्या हजारो घटना घडतात. पण, आजकाल अशी चोरीची घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. चोर फक्त संधी शोधत असतात आणि संधी मिळताच हात साफ करतात. अनेकवेळा चोर दिवसाही येतात आणि लोकांच्या गर्दीतही हात चलाखी दाखवतात. सध्या असाच एक व्हिडिओ लोकांसमोर आला आहे. ज्यामध्ये चोरट्याने स्कूटीच्या डिकीमधून सामान चोरून लोकांना दाखवले. या व्हिडिओतील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे चोरट्याने स्कूटीची काहीही मोडतोडकेली नाही आणि तिचे कुलूप न उघडता काही सेकंदात मौल्यवान वस्तू चोरल्या. (Viral Video of Thieves stole goods from Scooty without breaking the lock)
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, चोरीचा लाईव्ह डेमो पाहण्यासाठी पोलीस दुचाकी पार्किंगमध्ये पोहोचले आणि पकडलेल्या चोरट्यांना पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कूटीमधून सामान चोरण्यास सांगितले, त्यानंतर दोन्ही चोरट्यांना चोरी करण्यास सांगितले. त्यानंतर एका चोरट्याने स्कूटीचं कुशन वर खेचलं आणि दुसऱ्या चोरट्याने जागा होताच मध्येच हात टाकला आणि आत ठेवलेली पर्स बाहेर काढली. चोरीचा हा प्रकार पाहून शेजारी उभे असलेले पोलिसही चक्रावून गेले.
हा व्हिडिओ पाहा
View this post on Instagram
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटले आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘हा चोर खरोखरच हुशार आहे, त्याची हातचलाखी पाहून पोलिसही हादरले असतील. व्हिडिओवर कमेंट करताना दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘भावा! असा हात साफ करताना, मी कधीच पाहिलं नाही.” याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.
memes.bks नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला बातमी लिहिपर्यंत 33 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हेही पाहा:
2 नद्यांच्या संगमातून तयार होतो भारताचा नकाशा, जाणून घ्या आसाममधील अद्भूत ठिकाणाबद्दल!
Stock market : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं गुंतवणूकदारांना धडकी, शेअर मार्केटसह कमोडीटी मार्केटलाही फटका