Video: या चिमुरड्या मुलींच्या मुव्हज पाहून नोरा फतेहीही घायाळ, नेटकरी म्हणाले याल म्हणतात टॅलेंट

नुकताच सोशल मीडियावर तीन मुलींचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ एवढा आवडला आहे की, सोशल मीडिया यूजर्स तो पुन्हा पुन्हा पाहात आहेत. व्हिडिओमध्ये मुली ज्या पद्धतीने डान्स करत आहेत, ते नेटकऱ्यांना खूप आकर्षित करत आहे.

Video: या चिमुरड्या मुलींच्या मुव्हज पाहून नोरा फतेहीही घायाळ, नेटकरी म्हणाले याल म्हणतात टॅलेंट
नोरा फतेहीच्या गाण्यावर नाचणाऱ्या मुली
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 3:46 PM

जगात प्रतिभेची कमतरता नाही. असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे अद्भुत प्रतिभा आहे, परंतु त्यांना ते दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही, परंतु अशाही परिस्थितीत सोशल मीडिया त्यांना मदत करतो. आजच्या काळात हे असं ठिकाण बनले आहे की, जे कोणालाही रातोरात स्टार बनवू शकते. सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा जास्त प्रतिभावान लोकांचे व्हिडिओ गाजतात. नुकताच सोशल मीडियावर तीन मुलींचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ एवढा आवडला आहे की, सोशल मीडिया यूजर्स तो पुन्हा पुन्हा पाहात आहेत. व्हिडिओमध्ये मुली ज्या पद्धतीने डान्स करत आहेत, ते नेटकऱ्यांना खूप आकर्षित करत आहे. ( Viral Video of three Slum girls dance on kusu kusu nora fatehi share video amazing dance video )

व्हिडिओमध्ये तीन मुली ‘कुसू कुसू’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर तिन्ही मुलींनी दाखवलेल्या परफेक्ट मूव्ह्स पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओ शेअर करत नोराने लिहिले, ‘ओएमजी, हे खूप क्यूट आहे! तुम्ही लोक खूपच अप्रतिम आहात!’ पोस्टला 700k पेक्षा जास्त लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ‘सत्यमेव जयते 2’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘कुसु कुसू’ गाण्यावर तीन मुली नाचताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे या तिन्ही मुली झोपडपट्टीसमोर नाचताना दिसतील. त्यांचा डान्स पाहिल्यानंतर प्रत्येकजण म्हणेल की त्यांच्यात टॅलेंट भरलेले आहे.

हा व्हिडिओ पाहा

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोराने शेअर केलेल्या या व्हिडीओचे यूजर्सनी कौतुक केले. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘ओएमजी, हे खूप सुंदर आहे! तुम्ही लोक आश्चर्यकारक आहात! याशिवाय व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक इमोजीही दिसत आहेत.

‘कुसु कुसू’ हे गाणे ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटातील एक आयटम साँग आहे, ज्यामध्ये नोरा फतेही जोरदारपणे थिरकते. नोराच्या डान्स मूव्हज खूप किलर आहेत, जे पाहून तिच्या चाहत्यांच्या हृदयाला धक्का बसतो.

हेही पाहा:

Video: ‘डुब जा मेरे प्यार में’ गाण्यावर बेली डान्स, इन्स्टाग्रामवर आग लावणारा भन्नाट व्हिडीओ

Video: बेडकासोबतचा चिमुरडीचा क्युट व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, प्राण्यासोबतचं हे नातं खरंच गोड आहे

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.