VIDEO | DJ ला गाडी नसल्याने मुलांचं जुगाड, साऊंड खांद्यावर घेऊन वरात गाजवली, Video पाहून IPS म्हणाले, ‘लग्नात नो कॉम्प्रोमाईज’
लग्न हे प्रत्येकासाठी अत्यंत खास असते. लोक आपल्या या स्पेशल डेला अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेक गोष्टी करतात. लग्नात वधू-वरांव्यतिरिक्त शेजारी, स्थानिक लोक, नातेवाईक, कुटुंबातील सदस्यांचा तेवढाच सहभाग आमि योगदान असते. यामुळेच आपण लग्नाला खास बनवण्यासाठी आयुष्यभराची कमाई त्यात घालवतो.
मुंबई : लग्न हे प्रत्येकासाठी अत्यंत खास असते. लोक आपल्या या स्पेशल डेला अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेक गोष्टी करतात. लग्नात वधू-वरांव्यतिरिक्त शेजारी, स्थानिक लोक, नातेवाईक, कुटुंबातील सदस्यांचा तेवढाच सहभाग आमि योगदान असते. यामुळेच आपण लग्नाला खास बनवण्यासाठी आयुष्यभराची कमाई त्यात घालवतो.
आता सोशल मीडियावर लग्नातील अनेक विचित्र व्हिडीओ तुम्ही सर्वांनी पाहिले असतील, पण सध्या व्हायरल होत असलेला लग्नाचा अनोखा व्हिडीओ तुम्हाला हसायला लावेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू-वर नातेवाईकांसोबत जात आहेत. वऱ्हाडी त्यांच्यासमोर नाचत आहेत. या लग्नात डीजेची अनोखी व्यवस्था करण्यात आली आहे. डीजेसाठी गाडी नसली तरी उत्सवात कुठेही कमी पडू नये म्हणून लोकांनीच जुगाड करुन तो आपल्या खांद्यावर टाकला आहे.
पाहा व्हिडीओ –
Gareeb ki shaadi…..?☺️
But
NO COMPROMISE ☺️☺️☺️??@hvgoenka @RKharmujai @anirban1970 pic.twitter.com/dVkv5SbrYk
— Rupin Sharma IPS (@rupin1992) November 9, 2021
हा 24 सेकंदांचा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी शेअर केला आहे. ज्यासोबत त्याने कॅप्शन लिहिले, ‘गरीबांचे लग्न… पण तडजोड नाही.’ आतापर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, लोक या व्हिडीओवर कमेंटही करत आहेत.
Appreciate there boldness and mindset as they enjoyed same way where most of them cannot enjoy by restricting what people may think even after arranging better facilities ?
— Devendra (@devendra_dmk) November 9, 2021
Baratiyon n jo samajhdaari dikhai h Vh tarif e qaabil h , jo unhone n kiya , essa bhi ho saktaa tha Mobile with Power Bank and Bluetooth speakers any Brand.
— Jeetendra Jangid (@JeetendraJangi9) November 10, 2021
Emotions same hoti h sir amiro ki v aur garibo ki v
— Kumar Abhishek (@KumarAb17301338) November 9, 2021
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांच्या तो खूप पसंतीस पडत आहे. यामुळे यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “भावना सारखीच असते, मग ती गरीब असो किंवा श्रीमंत.” त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, ‘येथे फक्त खऱ्या मनाचे लोकच दिसत आहेत…. खोटे नातेवाईक आणि खोटे लोक इथे दिसत नाहीत.’ याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
संबंधित बातम्या :
Viral Video | मंदिरात चोरी करण्यापूर्वी चोराने घेतला देवाचा आशीर्वाद, व्हिडीओ व्हायरल
Viral Video | लोभी चिंपांझीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले हा तर मानवांसाठी एक खास संदेश