Video: एक टमटम, 4 पोलीस आणि पाणी साचलेला रस्ता, यूपी पोलिसांच्या नावाने व्हिडीओ व्हायरल
व्हिडिओमध्ये काही पोलीस ई-रिक्षात बसलेले दिसतात. हे सर्वजण कुठेतरी जात आहेत, तेव्हा ती ई-रिक्षा पाण्यात घालण्याची हिंमत रिक्षावाला करतो, आणि त्यानंतर जे होतं, त्यावर तुम्ही पोट धरुन हसाल.
सध्या यूपी पोलिसांच्या नावाने एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल आहे. व्हिडिओमध्ये काही पोलीस ई-रिक्षात बसलेले दिसतात. हे सर्वजण कुठेतरी जात आहेत, तेव्हा ती ई-रिक्षा पाण्यात घालण्याची हिंमत रिक्षावाला करतो, आणि त्यानंतर जे होतं, त्यावर तुम्ही पोट धरुन हसाल. हा व्हिडिओ IPS रुपिन शर्मा यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं आहे, ‘खतरों के खिलाडी’ (Viral Video Policemen e rickshaw submerged in water filled on the road IPS said Khatron ke Khiladi)
अवघ्या 21 सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये 4 पोलीस ई-रिक्षात बसलेले दिसत आहेत. थोड्याच वेळात ई-रिक्षा रस्त्यावर पाण्याने भरलेल्या खड्ड्यात अडकते आणि उलटते. यानंतर हे चारही पोलीस घाणेरड्या पाण्यात पडतात. तेवढ्यात तिथून जाणारे या लोक पोलिसांवर हसायला लागले, तेव्हा एक पोलिस त्यांना काही बोलू लागला.
पाहा व्हिडीओ:
#Police??
Khatron Ke Khiladi….. कहाँ कहाँ, कैसे कैसे काम पर जाना पड़ता है ☺️????? pic.twitter.com/htkdZK0CTq
— Rupin Sharma IPS (@rupin1992) October 8, 2021
तुमच्या माहितीसाठी, व्हिडीओ शेअर करणाऱ्याने हे यूपी पोलीस असल्याचा दावा केला आहे. पण यूपी पोलिसांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने हे नाकारत एक ट्विट केले आहे. त्याच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करताना UPUPPViralCheck, यूपी पोलिसांनी लिहिले आहे, व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशचा नाही तर राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातला आहे.
हेही पाहा:
Video: बस, ट्रेन, मेट्रो आणि जहाजाने प्रवास करणारा भटका कुत्रा बोझी, सोशल मीडिया बोझीचीच चर्चा
Video: हंड्यात पोरगी फसली, शर्थीचे प्रयत्न करुन हंडा कापला आणि पोरीला सोडवलं, व्हिडीओ व्हायरल