Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | पुणेकर आजोबांचा मेट्रो प्रवास, पत्रकारानं विचारली प्रतिक्रिया, आजोबांनी असं काही उत्तर दिलं… पाहा पुणेकर आजोबांनी काय म्हटलं?

शहरात मेट्रो आल्यानं पुणेकर मेट्रोचा आनंद घेतायेत. पहिल्यांदा मेट्रो आली म्हणजे पुणेकरांना त्याचं कौतुक असणारच. मेट्रोच्या अवतीभोवती पत्रकारही असतातच. अशातच एका पत्रकारानं एका पुणेकर आजोबांना मेट्रो प्रवासाबद्द्ल विचारलं. यावेळी त्या आजोबांनी पत्रकाराला असं काही उत्तर दिलं की त्या उत्तरानं पुणेकर आजोबांचा व्हिडीओ अवघ्या राज्यात व्हायरल झालाय.

Viral Video | पुणेकर आजोबांचा मेट्रो प्रवास, पत्रकारानं विचारली प्रतिक्रिया, आजोबांनी असं काही उत्तर दिलं... पाहा पुणेकर आजोबांनी काय म्हटलं?
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 11:36 AM

पुणे : पुणेकरांचे (pune) तुम्ही अनेक किस्से ऐकले असतील. पुणेकरांसाठी जेवण झाल्यानंतर दुपारची झोप हा खास जिव्हाळ्याचा विषय. दुपारच्या झोपेवरून पुणेकरांची कायम टिंगल केली जाते. तर पुणेकरांच्या पाट्यांबद्द्लही वेगळं सांगायला नको. पुणेकर कोणतंही उत्तर कधीच सरळ देत नाहीत. पुणेकरांचं शुद्ध बोलण्यावरूनही आपण नेहमी कौतुक करतो. अशातच पुण्यात मेट्रोच्या (metro) कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आलाय. पुणेकरांना मेट्रोचं खास गिफ्टचं (gift) मिळाल्याचं बोललं जातंय. आता शहरात मेट्रो आल्यानं पुणेकर मेट्रोचा आनंद घेतायेत. पहिल्यांदा मेट्रो आली म्हणजे पुणेकरांना त्याचं कौतुक असणारच. मेट्रोच्या अवतीभोवती पत्रकारही असतातच. अशातच एका पत्रकारानं एका पुणेकर आजोबांना मेट्रो प्रवासाबद्द्ल विचारलं. यावेळी त्या आजोबांनी पत्रकाराला उत्तर काही उत्तर दिलं. की आजोबांचा व्हिडीओ (Viral Video) अवघ्या राज्यात व्हायरल झालाय.

आजोबांचा व्हिडीओ व्हायरल

पुणेकर आजोबांचा मेट्रोमधील व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. हे पुणेकर आजोबा मेट्रोचा पहिला प्रवास करण्यासाठी मेट्रोत बसले. यावेळी पत्रकारानं लगेच त्यांना प्रतिक्रिया विचारली. पत्रकाराच्या या प्रश्नावर आजोबा उत्तर देतांना म्हटलंय की, उत्तच बसलो आणि नंतर या. आजोबांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर गंमतीशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. एकानं इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, पुणेकर जोरात आणि बाकी सगळे कोमात. दुसऱ्या एकानं लिहीलंय, इतकी कशाची घाई आहे. आजोबांना अनुभव तर घेऊ द्या. माहितीये ना आजोबा पुणेकर आहेत ते. अशा गंमतीशीर प्रतिक्रिया पुणेकर आजोबांच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओवर आल्या आहेत.

पाहा पुणेकर आजोबांचा व्हायरल व्हिडीओ

पुण्यात मेट्रोचा शुभारंभ

पुणे मेट्रोची वनाज ते रामवाडी हे 14.66 किलोमीटर तर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट ही 16.59 किलोमीटरची मार्गिका असून त्यामध्ये 14 स्थानके आहेत. 6 मार्चला या मेट्रो मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते उद्घाटन झालं. मागील अनेक वर्षांपासून पुणेकर मेट्रोची वाट पाहत होते. आता त्यांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

इतर बातम्या

शिवसेनेची लढाई ‘नोटा’शी होती, सेनेच्या गोव्यातील पराभवावर देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका

धक्कादायकः जेसीबीनं तहसीलदाराला चिरडण्याचा प्रयत्न, वाळूमाफियाच्या कृत्यानं वैजापुरात खळबळ!

करूणा शर्मा म्हणाल्या ,'15 लाखांची मागणी, मात्र मुंडे 2 लाख पोटगीपण..'
करूणा शर्मा म्हणाल्या ,'15 लाखांची मागणी, मात्र मुंडे 2 लाख पोटगीपण..'.
महिलेकडे काय आहे की तिला 1 कोटी द्यावे लागले? विरोधकांची गोरेंवर टीका
महिलेकडे काय आहे की तिला 1 कोटी द्यावे लागले? विरोधकांची गोरेंवर टीका.
'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका
'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका.
'एक बाई विचित्र आवाजात किंचाळल्या...' ,आंधारेंचा चित्रा वाघांवर निशाणा
'एक बाई विचित्र आवाजात किंचाळल्या...' ,आंधारेंचा चित्रा वाघांवर निशाणा.
5 वर्षांनंतर नवी 'दिशा', राणे यांनी ठाकरेंना घेरलं; सभागृहात काय घडलं?
5 वर्षांनंतर नवी 'दिशा', राणे यांनी ठाकरेंना घेरलं; सभागृहात काय घडलं?.
नागपूर राड्यामागे बांगलादेश कनेक्शन?हिंसा भडकवणारे 172 व्हिडीओ व्हायरल
नागपूर राड्यामागे बांगलादेश कनेक्शन?हिंसा भडकवणारे 172 व्हिडीओ व्हायरल.
दिशा सालियन प्रकरणात महायुतीचे 'हे' 3 आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूनं?
दिशा सालियन प्रकरणात महायुतीचे 'हे' 3 आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूनं?.
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.