पुणे : पुणेकरांचे (pune) तुम्ही अनेक किस्से ऐकले असतील. पुणेकरांसाठी जेवण झाल्यानंतर दुपारची झोप हा खास जिव्हाळ्याचा विषय. दुपारच्या झोपेवरून पुणेकरांची कायम टिंगल केली जाते. तर पुणेकरांच्या पाट्यांबद्द्लही वेगळं सांगायला नको. पुणेकर कोणतंही उत्तर कधीच सरळ देत नाहीत. पुणेकरांचं शुद्ध बोलण्यावरूनही आपण नेहमी कौतुक करतो. अशातच पुण्यात मेट्रोच्या (metro) कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आलाय. पुणेकरांना मेट्रोचं खास गिफ्टचं (gift) मिळाल्याचं बोललं जातंय. आता शहरात मेट्रो आल्यानं पुणेकर मेट्रोचा आनंद घेतायेत. पहिल्यांदा मेट्रो आली म्हणजे पुणेकरांना त्याचं कौतुक असणारच. मेट्रोच्या अवतीभोवती पत्रकारही असतातच. अशातच एका पत्रकारानं एका पुणेकर आजोबांना मेट्रो प्रवासाबद्द्ल विचारलं. यावेळी त्या आजोबांनी पत्रकाराला उत्तर काही उत्तर दिलं. की आजोबांचा व्हिडीओ (Viral Video) अवघ्या राज्यात व्हायरल झालाय.
पुणेकर आजोबांचा मेट्रोमधील व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. हे पुणेकर आजोबा मेट्रोचा पहिला प्रवास करण्यासाठी मेट्रोत बसले. यावेळी पत्रकारानं लगेच त्यांना प्रतिक्रिया विचारली. पत्रकाराच्या या प्रश्नावर आजोबा उत्तर देतांना म्हटलंय की, उत्तच बसलो आणि नंतर या. आजोबांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर गंमतीशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. एकानं इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, पुणेकर जोरात आणि बाकी सगळे कोमात. दुसऱ्या एकानं लिहीलंय, इतकी कशाची घाई आहे. आजोबांना अनुभव तर घेऊ द्या. माहितीये ना आजोबा पुणेकर आहेत ते. अशा गंमतीशीर प्रतिक्रिया पुणेकर आजोबांच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओवर आल्या आहेत.
पुणे मेट्रोची वनाज ते रामवाडी हे 14.66 किलोमीटर तर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट ही 16.59 किलोमीटरची मार्गिका असून त्यामध्ये 14 स्थानके आहेत. 6 मार्चला या मेट्रो मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते उद्घाटन झालं. मागील अनेक वर्षांपासून पुणेकर मेट्रोची वाट पाहत होते. आता त्यांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
इतर बातम्या