Video: जीव धोक्यात घालून हरणाच्या पाडसाला वाचवलं, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक हरणाचे पिल्लू नदीत बुडताना दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती झाडाच्या तुटलेल्या फांदीच्या मदतीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, त्या व्यक्तीने आपला जीव किती धोक्यात घालून हरणाच्या पिलाला पाण्यातून बाहेर काढले.

Video: जीव धोक्यात घालून हरणाच्या पाडसाला वाचवलं, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
तळ्यात बुडणाऱ्या हरणाच्या पाडसाला वाचवलं
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 4:44 PM

एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस नदीत बुडणाऱ्या हरणाच्या पिलाला वाचवताना दिसत आहे, आणि आपला जीव पणाला लावत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, नक्कीच, तुम्हीही या व्यक्तीचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप लाईक केला जात आहे. (Viral Video shows a baby deer drowning in the river saved by a man)

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक हरणाचे पिल्लू नदीत बुडताना दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती झाडाच्या तुटलेल्या फांदीच्या मदतीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, त्या व्यक्तीने आपला जीव किती धोक्यात घालून हरणाच्या पिलाला पाण्यातून बाहेर काढले. मग काही वेळ तो हरणाच्या पिल्लाकडे एकटक बघत राहतो. यानंतर ही व्यक्ती पिलाला खांद्यावर उचलून तलावाच्या बाहेर येते. आधी हा व्हिडीओ पाहा.

30 सेकंदांची ही व्हिडिओ क्लिप IFS सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जीवन जगण्याचा उद्देश केवळ आनंदी राहणे नाही तर उपयोगी असणं देखील आहे. 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शेअर केलेला हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 25 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 25 शेहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक त्यावर सतत व्यक्त होत आहेत.

IFS च्या मथळ्यावर उत्तर देताना एका युजरने कमेंट केली आहे की, जेव्हा तुम्ही आनंदी असाल, तरच तुम्ही उपयुक्त असल्याचे सिद्ध करू शकता. कारण जेव्हा तुम्ही उदास असता, तेव्हा तुम्ही स्वतःला मदत करू शकत नाही. त्याचवेळी आणखी एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, खूप चांगले सादरीकरण आणि उत्तम शब्दांचा वापर. हे जीवन केवळ तुमच्यासाठीच नाही, तर इतरांसाठीही आहे. त्याचवेळी, दुसर्‍या युजरने हरणाच्या पिलाला वाचवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक करत लिहिले आहे, खूप कौतुकास्पद, पण हे पिल्लू आईशिवाय जगू शकेल का?

हेही वाचा:

Video: रोजंदारीवरच्या मजुराचा डान्स बघून नेटकरी म्हणाले, “हा तर मायकल जॅक्सनपेक्षा भारी”

Video: “भाई, मुझे मारो” म्हणणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटप्रेमीचा नवा व्हिडीओ, नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद

 

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.