Video: गाडीतून उतरला आणि थेट 11 वाघांच्या कळपात गेला, पुढं जे झालं त्याने नेटकरी आवाक, चीनमधला व्हिडीओ व्हायरल
एक लहरी माणूस पिंजऱ्यातील 11 वाघांजवळ जातो आणि त्यांच्या समोर जाऊन बसतो. 34 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून कुणाच्याही हृदयाचे ठोके वाढू शकतात.
जंगलाचा राजा वाघ, ज्याला पाहून माणसांनाच काय तर जंगली प्राण्यांनाही घाम फुटतो. आता कल्पना करा की या वाघासमोर एखादी व्यक्ती बसली तर तिची अवस्था काय असेल? साहजिकच तुम्ही त्या व्यक्तीला मूर्ख समजाल. नुकतंच चीनमधील एका प्राणीसंग्रहालयात असंच हृदय पिळवटून टाकणारं दृश्य समोर आलं आहे, जिथं एक लहरी माणूस पिंजऱ्यातील 11 वाघांजवळ जातो आणि त्यांच्या समोर जाऊन बसतो. 34 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून कुणाच्याही हृदयाचे ठोके वाढू शकतात. ( Viral Video shows a Chinese Tourist confronts 11 white Tigers at Beijing Wildlife Park)
23 ऑक्टोबर रोजी बीजिंग वन्यजीव उद्यानात (Beijing Wildlife Park) ही चित्तथरारक घटना घडली. 56 वर्षांच्या या विक्षिप्त व्यक्तीला यावेळी अटक करण्यात आली. जियांग असे त्याचे नाव आहे. सुदैवाने वाघांनी त्याला कोणत्याही प्रकारे इजा केलेली नाही.
रिपोर्टनुसार, हा व्यक्ती प्राणिसंग्रहालयाला भेट देण्यासाठी आला होता, त्याचवेळी तो जीपमधून खाली उतरला आणि त्यांच्यासमोर जाऊन बसला. या व्यक्तीच्या मनात काय होते की, ज्यामुळे तो थेट 11 पांढऱ्या वाघांच्या कळपाकडे गेला हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, त्याने ही कृती न घाबरता केली, यावरुन तो मानसिक रुग्ण असावा असा अंदाज लावला जात आहे. व्हिडीओ पाहून तो आपल्या शौर्याचे प्रदर्शन करतोय असे वाटते.
चला तर मग आधी हा व्हिडीओ पाहूया.
Horrifying moment was captured when a tourist breaking into the tiger area in #Beijing Wildlife Park confronted 11 white tigers on Saturday. Fortunately, the tourist was not injured. pic.twitter.com/rqFMEj6Doo
— People’s Daily, China (@PDChina) October 24, 2021
या व्यक्तीच्या या कृत्यामुळे तिथे उपस्थित बाकीचे लोक तर घाबरलेच, पण वाघांचा कळपही गोंधळून गेला. वन्यजीव उद्यानाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी नकार दिल्यानंतरही या व्यक्तीने त्यांचं ऐकलं नाही आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून वाघांकडे गेला. चीनच्या उद्यानांमध्ये सेल्फ ड्राईव्हची सुविधा असते, ज्यात तुम्ही उद्यानाची गाडी चालवत प्राण्यांना पाहून शकता. याच सुविधेचा वापर या व्यक्तीने केला होता.
वन्यजीव उद्यानाच्या कर्मचाऱ्यांना माणसाच्या जीवाला धोका असल्याचे जाणवताच त्यांनी वाघांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर या व्यक्तीला तिथुन सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
हेही पाहा:
Video: विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाची कसरत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Video: पाकिस्तानी गायिका नताशा बेगच्या आवाजात माणिके मागे हितेचं नवं व्हर्जन, नेटकरी म्हणाले, हे भन्नाट आहे!