Viral Video:..म्हणतात मांजर डोळे झाकून दूध पिते,हा व्हिडीओ पाहा, तुम्हाला विश्वास बसणार नाही, मांजरही दुधासाठी करु शकते विनंती

दूध काढणाऱ्या व्यक्तीजवळ बसून आशावादी नजरेने पाहत बसलेल्या मांजरीने जेव्हा व्यक्तीला स्पर्श करत आपल्यासाठी दुधाची मागणी करते, त्यानंतर हा व्हिडीओ पाहताना खरी मज्जा येते.

Viral Video:..म्हणतात मांजर डोळे झाकून दूध पिते,हा व्हिडीओ पाहा, तुम्हाला विश्वास बसणार नाही, मांजरही दुधासाठी करु शकते विनंती
Cat video ViralImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 6:31 PM

मुंबईः पाळीव मांजर (Cat) हा प्राणी तसा चतुर आहे, मांजर घरातील दूध कुणाचीही नजर चुकवून पिऊन जाते तेव्हा मांजरा खरी डोकेदुखी ठरते.तर काही मांजरी खूप खोडकर आणि कृतीशील आहेत. आत्तापर्यंत तुम्ही मांजरींना गुपचूप दूध पिताना पाहिला असेल. पण तुम्ही कधी मांजरीला आदराने दूध (Cat asking Milk) मागताना पाहिले आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला अशाच मांजरीची गोष्ट सांगणार आहोत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती गाईचे दूध काढताना दिसत आहे, तर एक मांजर त्याच्या शेजारी बसून त्या व्यक्तीकडे बोट दाखवून त्याच्याकडून प्रेमाने दूध मागत आहे.

त्यामुळे दूध मागतानाचा हा व्हिडीओ तुम्ही जर बघितला तर तुम्हाला मांजरीचे अप्रूपही वाटेल आणि तुम्हाला हसूही आवरता येणार नाही.

दुधासाठी मांजर आशावादी

सोशल मीडियावर ज्या मांजरीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे, त्या व्हिडीओने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती गायीचे दूध काढताना दिसेल, जी व्यक्ती दूध काढत आहे, ती आपल्या कामात व्यस्त आहे. मात्र त्याचवेळी त्या व्यक्तीच्या शेजारी एक मांजरीही आशावादी नजरेने पाहत बसली आहे. कारण आपल्यालाही थोडी चव चाखायला मिळेल या आशेने जवळच बसलेली आहे. ती मांजरी फक्त दुधाच्या लालसेने जवळ फक्त बसली नाही तर तिला चांगलं कळतं आहे की, आता दूध काढत असताना आपणही त्या गायीच्या मालकाकडे दूध मागितले पाहिजे. म्हणून ती मांजरी दुधासाठी दूध काढणाऱ्या त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा स्पर्श करून हातवारे करत असल्याचे पाहायला मिळते आहे.

व्हिडीओ पाहताना खरी मज्जा

दूध काढणाऱ्या व्यक्तीजवळ बसून आशावादी नजरेने पाहत बसलेल्या मांजरीने जेव्हा व्यक्तीला स्पर्श करत आपल्यासाठी दुधाची मागणी करते, त्यानंतर हा व्हिडीओ पाहताना खरी मज्जा येते. मांजर स्पर्श करुन दूध मागते त्यानंतर गाईचे दूध काढणारा व्यक्तीही गाईच्या कासेतून दूध थेट मांजराच्या तोंडामध्ये सोडते. त्यावेळी मांजरानेही या संधीचा फायदा घेत मिळणाऱ्या दूध पिऊन घेतले. त्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

कॅप्शनही मजेशीर

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे, हा व्हिडीओ शेअर करताना त्याला कॅप्शनही मजेशीर देण्यात आले आहे. त्यांनी लिहिले, ‘फक्त प्रत्येकाचे हावभाव समजून घेणे आवश्यक आहे.’ आतापर्यंत 54 सेकंदांची ही क्लिप 5 लाख 72 हजारांहून अधिक यूजर्संनी पाहिले आहेत. तर या पोस्टला 27 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.