Video: टाच मारली आणि बी पेरलं, शेतात अनोख्या पद्धतीने पेरणी करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल
व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पुरुष आणि एक महिला शेतात नवीन पिकासाठी बियाणे पेरण्याचे काम करत आहेत. व्हिडीओमध्ये, पुरुष एक पोतं घेऊन बसलेला दिसतो, तर महिला पिकांसाठी बनवलेल्या वाफ्यात बिया पेरताना दिसत आहे.
सोशल मीडियाच्या जगात कधी आणि काय पाहायला मिळेल हे कुणीही सांगू शकत नाही. यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही विचारात पडता, काही व्हिडिओ इतके मजेदार असतात की अनेकजण ते मित्रांमध्ये शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू आवरता येणार नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांनी आपलं वेगळे मतही मांडलं आहे. पण बहुतांश लोकांना हा व्हिडिओ खूपच हास्यास्पद वाटला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे या व्हिडिओमध्ये. (Viral Video shows Woman sown seeds in the field in a unique way)
व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पुरुष आणि एक महिला शेतात नवीन पिकासाठी बियाणे पेरण्याचे काम करत आहेत. व्हिडीओमध्ये, पुरुष एक पोतं घेऊन बसलेला दिसतो, तर महिला पिकांसाठी बनवलेल्या वाफ्यात बिया पेरताना दिसत आहे. यावेळी महिला ज्या पद्धतीने बी पेरत आहे, ते पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू येईल. ही महिला प्रथम जमिनीवर टाच मारून खड्डा बनवते, नंतर त्यात बिया टाकते आणि मातीने तो पुन्हा बुजवते.
व्हिडीओ पाहा:
View this post on Instagram
अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 10 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. त्याचवेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक सतत त्यांच्या कमेंट्स करत आहेत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, युजर्सचे मत विभागले गेले आहे. काहींना स्त्रीची बी पेरण्याची ही पद्धत आवडली आहे तर काहींना हा व्हिडीओ फक्त एक हसवणारा व्हिडीओ वाटतो आहे. एकाने या व्हिडीओवर लिहिले आहे, हा एक मजेदार व्हिडिओ आहे. त्याच वेळी, बहुतेक वापरकर्त्यांनी इमोजीजद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही पाहा:
Video: जीव धोक्यात घालून हरणाच्या पाडसाला वाचवलं, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Video: रोजंदारीवरच्या मजुराचा डान्स बघून नेटकरी म्हणाले, “हा तर मायकल जॅक्सनपेक्षा भारी”