Video : “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…”, अपंग मित्राला घेऊन निघाल्या दोघी मैत्रिणी, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव…

Viral Video : सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात तिघा मित्रांची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. यात दोन मैत्रिणी आणि त्यांचा एक मित्र दिसत आहे. यातला मुलगा हा अपंग आहे. त्यामुळे या दोघी त्याला उचलून घेतात आणि चालायला लागतात. हा व्हीडीओ केरळमधील आहे.

Video :  ये दोस्ती हम नहीं तोडेंगे..., अपंग मित्राला घेऊन निघाल्या दोघी मैत्रिणी, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव...
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 2:09 PM

मुंबई : मैत्री… दोस्ती… यारी… तीन वेगवेगळे पण त्याचा अर्थ एकच… विश्वास अन् प्रेम… हे नातंच वेगळं असतं. रक्ताचं नात नसताही आपले मित्र-मैत्रिणी (Friends) अनेक वेळा आपल्यासोबत खंबीर उभं असल्याचं पाहायला मिळतं. अश्या दोस्ती, यारीवर अनेक चित्रपटही बनले आहेत. अगदी शोले (Shole) चित्रपटातील जय-वीरूच्या दोस्तीचं अनेकदा उदाहरण दिलं जातं. मराठीतील दुनियादारी (Duniyadari) या सिनेमाने तर सगळ्यांनाच खऱ्या मैत्रीचा अर्थ समजावला. असाच मैत्रीच्या दुनियेतील’राजा व्हीडिओ’ सध्या व्हायरल होत आहे. यात तिघा मित्रांची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. यात दोन मैत्रिणी आणि त्यांचा एक मित्र दिसत आहे. यातला मुलगा हा अपंग आहे. त्यामुळे या दोघी त्याला उचलून घेतात आणि चालायला लागतात.

व्हायरल व्हीडिओ

सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात तिघा मित्रांची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. यात दोन मैत्रिणी आणि त्यांचा एक मित्र दिसत आहे. यातला मुलगा हा अपंग आहे. त्यामुळे या दोघी त्याला उचलून घेतात आणि चालायला लागतात. हा व्हीडीओ केरळमधील आहे. या व्हायरल व्हीडीओमधील तरुणाचं नाव अलिफ मोहम्मद असं आहे. या व्हिडीओमध्ये अलिफला त्याच्या दोन मैत्रिणी उचलून घेऊन चालायला लागतात. हा व्हिडीओ केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील सस्थमकोट्टा येथील डीबी कॉलेजच्या कॅम्पसमधील आहे.

केरळमधील हा तरूण अलिफ मोहम्मद जन्मत:च दिव्यांग आहे. अलिफला जन्मापासूनच पाय नाहीत. पण त्याच्याकडे त्याचे मित्र-मैत्रिणी आहेत. जे त्याला नेहमी आधार देतात. त्याचा दोन मैत्रिणी त्याला असंच कॉलेजमध्ये खांद्यावर सोबत घेऊन फिरतात. अलिफ बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला आहे.

व्हायरल व्हीडिओविषयी अलिफने सांगितलं की, “या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दोन तरुणी माझ्या मैत्रिणी आहेत. त्या नेहमी मला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फिरण्यास मदत करतात. माझे मित्रमैत्रिणी मला कॅम्पसमध्ये खांद्यावर घेऊन फिरवतात. एकीकडे काही लोक धर्माच्या नावावर समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे हा व्हिडीओ सर्व जाती, धर्माच्या पलिकडील भावना आणि प्रेमाची बरसात करत आहे.”

संबंधित बातम्या

Video : चिमुकल्याचं मांजर प्रेम, व्हीडिओ पाहून म्हणाल, “मैत्री असावी तर अशी…!”

Video : सिंहाचा एक कटाक्ष आणि तरस गपगार… 5 सेकंद वेळ काढून हा व्हीडिओ बघाच…

Photo : रिसॉर्ट नव्हे तर कारागृह, 5 स्टार हॉटेललाही लाजवतील असे सोई-सुविधांयुक्त लक्झरी जेल…

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.