पतीने म्हटले, तंदुरी रोटी खाणार, पत्नीने असा फंडा लढवला की व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Viral Video: १८ सेंकदाच्या व्हिडिओत महिला घरातच कशी तंदुरी रोटी बनवता येईल, ते सांगत आहे. व्हिडिओमध्ये महिलेने काही रोटी लाटून ठेवलेली दिसत आहे. त्यानंतर सर्व रोटीला पाणी लावून कुकरमध्ये आतील भागात चिपकून देते.

पतीने म्हटले, तंदुरी रोटी खाणार, पत्नीने असा फंडा लढवला की व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
व्हायरल व्हिडिओत तंदुरी बनवताना महिला.
Follow us
| Updated on: May 03, 2024 | 1:50 PM

घरात अशक्य असणारी तंदुरी रोटी बनवण्यास पतीने सांगितली. हॉटेलमध्ये न जात आपण घरीच तंदुरी खाणार असल्याचे पतीने सांगितले. मग पत्नीने हार पत्करली नाही. गरज ही शोधची जननी असल्याची प्रत्यय तिने आणून दिला. तिने घरातच पतीला तंदुरी रोटी तयार करुन दिली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर तिच्याकडून करण्यात आलेल्या जुगाडाचे कौतूक केले जात आहे. हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये

ट्विटवर (सध्याचे X) हरीश चव्हाण या युजर्सने एक व्हिडिओ अपलोड केला आहे. “है प्रभू…. है हरिराम…ये क्या हुआ….” असे कॅप्शन व्हिडिओला दिले आहे. त्या १८ सेंकदाच्या व्हिडिओत महिला घरातच कशी तंदुरी रोटी बनवता येईल, ते सांगत आहे. व्हिडिओमध्ये महिलेने काही रोटी लाटून ठेवलेली दिसत आहे. त्यानंतर सर्व रोटीला पाणी लावून कुकरमध्ये आतील भागात चिपकून देते. त्यानंतर कुकर गॅसवर उलटा करते. थोड्या वेळेत रोटी चांगली भाजली जाते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस

व्हिडिओ लाखो लोकांनी पहिला आहे. दोनच दिवसांत सहा लाख लोकांनी व्हिडिओ पहिला. हजारो जणांनी त्याला लाईक केली आहे. प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. एक युजर म्हणतो, आजपर्यंत अशी आयडिया कोणत्याही पुरुषाला आली नाही. घरात तंदुरी रोटी बनवण्याचे आव्हान महिलने समर्थपणे पेलल्याचे दुसरा युजर म्हणतो. एकाने त्याला तंदुरी कुकर रोटी नाव दिले आहे. देशात प्रतिभेची कमतरता नाही, असे आणखी एक जण म्हणतो.

नवीनवीन गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांना शिकण्यास मिळत आहे. सोशल मीडियाचा हा फायदा सर्वांना होऊ लागला आहे. त्यामुळे रोज सोशल मीडियावर एक तास घालवणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.