लग्नपत्रिका की वॉर्निंग लेटर? काय लिहिलंय त्यात?; सोशल मीडियावर एका वेडिंग कार्डचा धुमाकूळ
मध्य प्रदेशातील चंबळमधील एका लग्नाचं कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यात नवरदेवाच्या वडिलांनी लग्नात शस्त्रे आणू नयेत अशी विनंती केली आहे. चंबळमध्ये लग्नात हर्ष फायरिंगची प्रथा असल्याने ही विनंती खूप महत्त्वाची आहे. कुटुंबाचा उद्देश लग्नात शांतता राखणे आणि हिंसाचारापासून बचाव करणे हा आहे. या अनोख्या कार्डमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
सध्या लग्नाचा सीजन सुरू आहे. त्यामुळे लग्नाच्या अनेक गंमती जमतीही समोर येताना दिसत आहे. मध्यप्रदेशातील चंबळमधील एका लग्नाचं वेडिंग कार्ड चांगलंच व्हायरल झालं आहे. ही लग्नपत्रिका पाहून सर्वच हैराण झाले आहेत. काही लोक तर या लग्नपत्रिकेचं कौतुक करून थट्टा मस्करीही करताना दिसत आहेत. या लग्नाच्या पत्रिकेवर नवरदेवाच्या वडिलांनी अशी काही गोष्ट लिहिलीय की ही लग्नपत्रिकाच चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर तर ही लग्नपत्रिका तुफान व्हायरल झाली आहे.
काय लिहिलं त्यात?
या लग्नपत्रिकेत कुटुंबाने मजेशीर मजकूर लिहिला आहे. हातजोडून विनंती आहे. आम्हा दोन कुटुंबाचे प्रेम संबंध जुळणार आहेत. वादविवाद नाही. कृपया लग्न समारंभात शस्त्रे घेऊन येऊ नये, असं आवाहन या लग्नपत्रिकेतून वराच्या पित्याने केलं आहे. चंबळच्या लग्नात बंदूक आणि हर्ष फायरिंग नेहमीच होते. त्यामुळे अनेक मोठ्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळेच या कुटुंबाने अनोखी लग्नपत्रिका केली आहे. त्यात त्यांनी वऱ्हाडींना हातजोडून विनंती केली आहे. लोकांना जागरूक करण्यासाठी आम्ही हे केलंय असं या कुटुंबाचं म्हणणं आहे.
अनोखी अट
लग्नाचं जे कार्ड सोसल मीडियावर व्हायरल होत आहे, ते भिंडच्या गोहदच्या खनेता धाम मंदिराचे महंत राम भूषण दास यांचा भाचा गणेशच्या लग्नाचं आहे. गणेशचं लग्न उद्या 6 डिसेंबर रोजी आहे. लग्नाच्या कार्डावर नवरदेव आणि नवरीचं नाव आहे. लग्नपत्रिकेवर नवरदेव आणि नवरीचं नाव आहे. त्यावर तारीख आहे. आणि पेज कव्हरवर दिसेल अशा पद्धतीने ही सूचना लिहिली आहे.
जागृतीसाठी कायपण
या कुटुंबातील लोकांनी या सूचनेमागचं कारण सांगितलं. लग्नात उगाच खून खराबा नको. वादावादी नको. हा एक आनंदाचा सोहळा आहे. त्या ठिकाणी आनंदच साजरा झाला पाहिजे. अशावेळी बंदुका कशाला हव्यात? असं या कुटुंबाचं म्हणणं आहे. ग्वाल्हेर आणि चंबळमध्ये बंदूक बाळगणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. पण एखाद्याचा पारा चढला तर या बंदुकीने घात होतो, असंही कुटुंबाने सांगितलं.
यूजर्स काय म्हणतात?
सोशल मीडियावर हे कार्ड व्हायरल झालं आहे. त्यावर यूजर्सच्या रिअॅक्शन येत आहे. ही एक चांगली सुरुवात आहे, असं एकाने म्हटलंय. तर हे लग्नाचं कार्ड की वॉर्निंग लेटर? असा सवाल दुसऱ्या यूजर्ने केला आहे. एका यूजर्सने तर कुटुंबाचं हे चांगलं पाऊल समाजाला चांगला संदेश देणार आहे, असं म्हटलंय.