दृष्टिहीन मातेचे हे अमूल्य प्रयत्न! रडवणारा व्हिडीओ
अंध आई आणि तिच्या मुलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ लोकांना भावूक करतोय. इन्स्टाग्रामवर शेअर केलेली ही क्लिप तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.
आपले जीवन चांगले आणि सोपे करण्यासाठी आपले आई-वडील बरेच काही करतात. आपल्याला न मिळालेले सर्व काही देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हा व्हायरल झालेला व्हिडीओ बघून तुम्ही अतिशय भावूक व्हाल. तुम्हाला तुमच्याही आई वडिलांनी केलेले कष्ट आठवतील, दिसतील. आपण विचार करत असाल की आम्ही कशाबद्दल बोलत आहोत. दृष्टीहीन असलेली स्त्री आपल्या रडणाऱ्या मुलीला भाकरी, तेल आणि मीठ देते. अंध आई आणि तिच्या मुलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ लोकांना भावूक करतोय. इन्स्टाग्रामवर शेअर केलेली ही क्लिप तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. या व्हिडिओमध्ये एक अंध आई आपल्या भुकेल्या मुलीला कसे खाऊ घालते हे दाखवण्यात आले आहे.
या व्हिडिओमध्ये एक अंध आई आपल्या रडणाऱ्या मुलीला भाकरी खाऊ घालताना दिसत आहे. डोळ्यांनी पाहू न शकणारी ती स्त्री स्वत:च्या अंदाजाने भाकरी उचलते आणि तेल शोधू लागते. तेल मिळताच ती चपातीवर तेल आणि मीठ लावते. तिच्या समोर तिची मुलगी उपाशी आहे म्हणून तिने स्वत: जेवण केले नाही आणि आपल्या मुलीला घास भरवला. दृष्टिहीन मातेचे हे अमूल्य प्रयत्न पाहून व्हिडिओ पाहणारा कोणीही थक्क होईल. आपण हा व्हिडिओ चुकवू नये कारण आज आपण इंटरनेटवर पाहणारी ही सर्वात चांगली गोष्ट असू शकते. @loves_xpress नावाच्या युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओला 6 मिलियनहून अधिक लाइक्स मिळाले असून हजारो कमेंट्स आल्या आहेत. आणखी एका युजरने लिहिले की, “देव तिला आणि तिच्या मुलीला आशीर्वाद देईल.” तिसऱ्याने कमेंट केली, “मी हा व्हिडिओ सेव्ह करणार आहे आणि अधूनमधून या व्हिडिओचा आनंद घेईन.