वेटरच्या एका हातात 16 प्लेट्स, इम्प्रेस होऊन आनंद महिंद्रा म्हणाले
त्याचं कौशल्य इतकं अप्रतिम आहे की त्याला पाहून सर्वसामान्य लोक थक्क होतात! खरं सांगा, तुम्ही एका हातात किती प्लेट्स घेऊन जाऊ शकता?
उद्योगपती आणि ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांचे ट्विट व्हायरल व्हायला काही मिनिटे लागत नाहीत. महिंद्रा हे नामवंत उद्योगपती असले, तरी त्यांचे ट्विट्स जनतेला आवडतात कारण ते व्यवसायापेक्षा आयुष्याशी निगडित सर्वोत्तम क्षण शेअर करतात! आता देसी जुगाडचे व्हिडिओ असोत किंवा कोणतेही मोटिव्हेशनल क्लिप्स असोत, आनंद महिंद्रा काहीतरी नवीन घेऊन येतात. नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला हा वेटर एका हातात डोसाच्या 16 प्लेट घेऊन जाऊ शकतो. कसे काय? हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल.
हा व्हिडिओ 2.20 मिनिटांचा आहे. याची सुरुवात हॉटेलच्या स्वयंपाकघरापासून होते. जिथे मोठ्या प्रमाणात डोसे बनवले जात आहेत. एका मोठ्या कढईवर अनेक डोसे शिजत असल्याचे आपण पाहू शकतो. डोसे शिजवले की शेफ एक-एक करून ते प्लेटवर ठेवतो, ज्याच्या शेजारी उभा असलेला वेटर त्याच्या उलट्या हातावर अशा प्रकारे सेट करतो की त्याला एका हातात एकूण 16 प्लेट्स मिळतात.
यानंतर तो ग्राहकांकडे जातो आणि त्यांच्या टेबलवर एक-एक करून त्यांची ऑर्डर ठेवतो. वेटरची ही स्टाईल सांगत आहे की, तो बऱ्याच काळापासून अशा प्रकारे काम करत आहे. त्याचं कौशल्य इतकं अप्रतिम आहे की त्याला पाहून सर्वसामान्य लोक थक्क होतात! खरं सांगा, तुम्ही एका हातात किती प्लेट्स घेऊन जाऊ शकता?
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी 31 जानेवारी रोजी ट्विटरवर हा शानदार व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले- आपल्याला ‘वेटर प्रॉडक्टिव्हिटी’ला ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता देण्याची गरज आहे, ज्याच्या स्पर्धेत ही हुशार व्यक्ती सुवर्णपदकाची दावेदार असेल.
या व्हिडिओला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 32 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच हजारो युजर्स यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, एक आश्चर्यकारक कौशल्य आहे. यालाच आपल्या कामावरील प्रेम म्हणतात.
We need to get ‘Waiter Productivity’ recognised as an Olympic sport. This gentleman would be a contender for Gold in that event… pic.twitter.com/2vVw7HCe8A
— anand mahindra (@anandmahindra) January 31, 2023
आणखी एका युजरने लिहिलं- फक्त प्लेट्स खालून स्वच्छ असायला हव्यात. तर काही युजर्सनी हा बंगळुरुच्या ‘विद्यार्थी भवन’ हॉटेलचा सीन असल्याचा दावा केला आहे.